चाकरमान्यांसाठी खूषखबर! कोकण रेल्वेच्या रो-रो कार सेवेसाठी आता नांदगाव मध्ये थांबा

कोकण रेल्वेच्या रो-रो कार सेवेतून आता गोव्यात जायची गरज नाही.चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेने रो-रो कार सेवेचा नांदगाव रेल्वेस्थानकात थांबा दिला आहे.त्याची घोषणा आज कोकण रेल्वेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे करत चाकरमान्यांना गणपतीची खूषखबर दिली आहे.
कोकण रेल्वेने यंदा गणेशोत्सवात रो-रो कार सेवा सुरू करण्याची घोषणा केली मात्र हि सुरुवातीला हि सेवा कोलाड ते वेरणा अशी होती.त्याकरिता पाच टक्के जीएसटी सहीत 7 हजार 875 रूपये शुल्क आकारण्यात आले होते.कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी रो-रो कार सेवेचा प्रवास म्हणजे वाई वरून सातारा असा होता. मात्र आज कोकण रेल्वेने चाकरमान्यांना खूषखबर दिली आहे. रो-रो कार सेवेसाठी नांदगाव येथे थांबा देण्यात आला आहे.
कोलाड ते नांदगाव दरम्यान आता पाच टक्के जीएसटीसहित 5 हजार 450 रूपये मोजावे लागणार आहेत.रो-रो कार सेवेच्या नोंदणीची तारीख वाढवण्यात आली असून आता दि.18 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत नोंदणी करता येणार आहे. नोंदणी शुल्क जीएसटीसहित 4 हजार रुपये ठेवण्यात आले आहे.प्रवाशांना कारमधून बसून प्रवास करता येणार नाही.प्रवाशांसाठी थ्री एसी आणि चेअर एसीचे डबे ठेवण्यात आले आहेत.फक्त तीन प्रवाशांना प्रवास करता येणार असून दोन प्रवासी थ्री एसी डब्यातून व एक प्रवासी चेअर डब्यातून प्रवास करणार आहे.
Comments are closed.