कृती सेनन म्हणते, बॉलीवूडमध्ये पुरुषांचे वर्चस्व

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

बॉलीवूडमध्ये आठ तास कामाच्या शिफ्टवरून दीपिका पदुकोणने आवाज उठवल्यानंतर आता कलाकाराच्या मानधनावरून चर्चा रंगत आहे. अभिनेत्री कृती सेनन ही बॉलीवूडमधील पुरुष आणि स्त्रिया यांना मिळणाऱ्या मानधनावर स्पष्टपणे बोलली आहे. बॉलीवूडमध्ये अजूनही पुरुषांचे वर्चस्व असून त्यांच्या तुलनेत महिलांना कमी मानधन मिळते. महिला कलाकार समान मेहनत करतात, तरीही मानधनात मोठा फरक आहे. महिला-प्रधान चित्रपटांबाबत निर्माते आजही धोका पत्करण्यास घाबरतात. कारण त्यांना वाटते की असे चित्रपट पुरुषप्रधान चित्रपटांइतका व्यवसाय करू शकणार नाहीत, असे ती म्हणाली.

Comments are closed.