कुलदीप, चुकीच्या व्यक्तीला बोलावले…; त्याला लग्नात पाहाताच चहल जोरात ओरडला, धनश्रीसोबत थेट कन
कुलदीप यादव वंशिका लग्नाच्या बातम्या : भारताचा स्टार फिरकीपटू कुलदीप यादव (Kuldeep Yadav) अखेर लग्नबंधनात अडकला आहे. कुलदीपने 14 मार्च रोजी बालमैत्रीण वंशिका चड्ढासोबत लग्नगाठ बांधली. उत्तराखंडमधील मसूरी येथील आलिशान सॅवॉय हॉटेल, मसुरी येथे हा शाही विवाहसोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी दोन्ही कुटुंबीय, जवळचे मित्र आणि क्रिकेटविश्वातील अनेक दिग्गज उपस्थित होते. या लग्नाचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे या लग्नात असा एक व्यक्तीही दिसला, जो याआधी युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि धनश्री वर्माच्या (Dhanashree Verma) लग्नातही उपस्थित होता. यावर चहलची मजेशीर प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरली आहे.
लग्नात त्याला पाहाताच चहल जोरात ओरडला (Yuzvendra Chahal VIDEO Kuldeep Yadav Vanshika Wedding)
या विवाह सोहळ्याला तिलक वर्मा, रिंकू सिंग, मोहम्मद कैफ, सुरेश रैना यांसारख्या अनेक क्रिकेटपटूंनी हजेरी लावली. मात्र, संपूर्ण कार्यक्रमात सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते युजवेंद्र चहलने. त्याचे डान्स व्हिडिओ, तसेच कुलदीप आणि वंशिकाला हल्दी लावतानाचा त्याचा अंदाज सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. या सगळ्यात चहलचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात तो आयुष कुमारसोबत मजा करताना दिसतो. या व्हिडिओमध्ये चहल हसत-हसत कुलदीपला म्हणताना ऐकू येतो, “कुलदीप, चुकीचा व्यक्तीला बोलावला आहेस.” त्यानंतर आयुष त्याच्या गळ्यात हात टाकत हसताना दिसतो. या व्हिडिओमध्येच चहल आणि त्याची एक्स वाइफ धनश्री वर्मा देखील दिसतात, जिथे आयुष त्यांच्या लग्नात अँकरिंग करताना दिसला होता.
आता प्रश्न पडतो की हा आयुष कुमार नेमका कोण आहे? (कोण आहे अँकर आयुष कुमार)
आयुष कुमार हा ‘Plan My Show’ नावाची कंपनी चालवतो. उपलब्ध माहितीनुसार, तो दिल्लीचा रहिवासी असून एक प्रोफेशनल अँकर आणि व्हॉइस-ओव्हर आर्टिस्ट आहे. आयुष आपल्या भन्नाट स्टाइल, नैसर्गिक संवादशैली आणि उत्साही सादरीकरणासाठी ओळखला जातो. त्याने जगभरात 500 हून अधिक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले आहे. त्याची खासियत म्हणजे भन्नाट वन-लाइनर्स आणि मजेशीर किस्से, ज्यामुळे कार्यक्रमाचा माहोल अधिक रंगतदार बनतो. कोणतीही परिस्थिती सहज हाताळण्याची त्याची कला त्याला इतरांपेक्षा वेगळं ठरवते. अनेक मोठ्या सेलिब्रिटींच्या लग्नांमध्ये आणि हाय-प्रोफाइल इव्हेंट्समध्ये त्याने यशस्वी सूत्रसंचालन केले आहे.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.