मेंहदी रंगली, हळद लागली! कुलदीप यादवच्या लग्नाची धूम, टीम इंडियाचे स्टार्स एकत्र, कोण-कोण आलं?
कुलदीप यादव लग्नाच्या मराठी बातम्या : टीम इंडियाने नुकताच 8 मार्च रोजी टी-20 वर्ल्डकप 2026 जिंकत इतिहास रचला. या विजयी संघात स्टार फिरकीपटू कुलदीप यादव याचाही समावेश होता. आता क्रिकेटमधून थोडा ब्रेक मिळाल्यानंतर कुलदीप आयुष्यातील नव्या इनिंगला सुरुवात करणार आहे. 14 मार्च रोजी मसुरी येथील सेवाय हॉटेलमध्ये तो वंशिका चड्ढासोबत सात फेरे घेणार आहे. कुलदीपच्या लग्नासाठी त्याचे कुटुंब काही दिवसांपूर्वीच मसुरीत पोहोचले होते. 13 मार्च रोजी हळद आणि मेहंदीचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या समारंभाला भारतीय क्रिकेट संघातील अनेक खेळाडू उपस्थित राहण्यासाठी मसुरीत दाखल झाले आहेत.
कुलदीप यादव आणि त्यांची पत्नी वंशिका त्यांच्या लग्नासाठी खूप उत्साहित आहेत दोघेही आनंदाने नाचत आहेत.😅❤️🔥 pic.twitter.com/ZREgVf58aO
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) 13 मार्च 2026
मेहंदी सोहळ्यात टीम इंडियाचे स्टार्स एकत्र…
कुलदीपच्या लग्नातील सर्व कार्यक्रम मसुरीतील सेवाय हॉटेलमध्येच होत आहेत. या समारंभासाठी रिंकू सिंग आपल्या होणाऱ्या पत्नी प्रिया सरोजसोबत मसुरीत पोहोचला आहे. तसेच अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारही आपल्या कुटुंबासह लग्नसोहळ्यात सहभागी होण्यासाठी आला आहे.
कुलदीप यादवच्या लग्नासाठी रिंकू सिंग आणि त्याची मंगेतर प्रिया सरोज डेहराडून-मसुरी येथे पोहोचल्या आहेत.🫡🙏 pic.twitter.com/yuSkuWZbFh
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) 13 मार्च 2026
याशिवाय लेग स्पिनर युझवेंद्र चहल आणि टीम इंडियाचे फील्डिंग कोच टी. दिलीप हेही हळद-मेहंदीच्या कार्यक्रमापूर्वीच मसुरीत दाखल झाले होते. अभिनेता कुणाल कपूर सहअनेक मान्यवर पाहुणेही या सोहळ्यासाठी पोहोचले आहेत. काही पाहुणे आज संध्याकाळपर्यंत तर काही उद्या सकाळपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
कुलदीप यादवच्या हळदी समारंभातील गोड क्षण शेअर करताना युझवेंद्र चहल आणि टी. दिलीप. ❤️ pic.twitter.com/HJCuGTMf3I
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) 13 मार्च 2026
हळदीच्या कार्यक्रमानंतर कुलदीप आपल्या होणाऱ्या पत्नी वंशिकासोबत माध्यमांसमोरही आला होता. त्यावेळी कुलदीपने गुलाबी रंगाचा पोशाख परिधान केला होता, तर वंशिका लाल रंगाच्या साडीत अतिशय सुंदर दिसत होती.
असे दिसते आहे की युझवेंद्र चहलने त्याचा मित्र कुलदीप यादवच्या लग्नात थोडेसे मद्यपान केले असेल आणि त्याचे हृदय बाहेर नाचत असेल. 😂🔥❤️ pic.twitter.com/diNXiPhmqK
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) 13 मार्च 2026
गेल्या वर्षी झाला होता साखरपुडा
टीम इंडियाचा स्टार स्पिनर कुलदीप यादव आणि वंशिका चड्ढा यांचा 4 जून 2025 रोजी साखरपुडा झाला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील व्यस्त वेळापत्रकामुळे लग्न पुढे ढकलण्यात आले होते. आता मात्र दोघेही लग्नबंधनात अडकणार आहेत. या विवाहसोहळ्यात कुलदीपचे जवळचे मित्र, कुटुंबीय आणि क्रिकेटविश्वातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच 17 मार्च रोजी लखनौमध्ये भव्य रिसेप्शनही आयोजित करण्यात आले आहे. लग्नानंतर कुलदीप पुन्हा क्रिकेटमध्ये परतणार असून तो लवकरच आयपीएलमध्ये आपल्या संघासाठी खेळताना दिसणार आहे.
हे ही वाचा –
Ban vs Pak 2nd ODI : पाकिस्तान-बांगलादेश सामन्यात चिडाचिडी अन् रडारडी, कधीही न पाहिलेला रनआऊट VIDEO
आणखी वाचा
Comments are closed.