IND vs AUS: कुलदीपची एन्ट्री, हर्षित-सुंदरचा पत्ता कट? तिसऱ्या वनडेत कशी असेल टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन

पर्थनंतर एडिलेडमध्येही टीम इंडियाला (Team india) पराभवाला सामोरे जावे लागले. सलग दोन सामने हरल्यामुळे भारतीय टीमने ही मालिका गमावली आहे. आता सिडनीत टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या वनडेमध्ये सन्मानासाठी खेळणार आहे.

कर्णधार शुबमन गिल (Shubman gill) आपल्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला या फॉरमॅटमध्ये पहिला विजय मिळवण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल. रोहित शर्मा (Rohit Sharma) दुसऱ्या वनडेमध्ये चांगली लय दाखवली होती, पण संघाला विराट कोहलीकडूनही (Virat Kohli) खास खेळीची अपेक्षा आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाची टीम मालिका 3-0 ने जिंकण्याचा प्रयत्न करेल. ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज या मालिकेमध्ये खूप प्रभावी ठरले आहेत.

सलग दोन सामन्यांत प्लेइंग 11 मधून बाहेर बसलेल्या कुलदीप यादवला (Kuldeep yadav) तिसऱ्या वनडेमध्ये कर्णधार शुबमन गिल (Shubman gill) अंतिम संघात संधी देऊ शकतो. कुलदीपचा सध्या फॉर्म उत्कृष्ट आहे. आशिया कप 2025 (Asia Cup) मध्ये त्याने चांगले प्रदर्शन केले तसेच वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेमध्येही त्याने जोरदार कामगिरी केली होती. सिडनीमध्ये कुलदीप टीमसाठी मोठा मॅच विनर ठरू शकतो. जर कुलदीपला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळाले, तर वॉशिंगटन सुंदरला (Washington Sundar) बाहेर बसावे लागू शकते.

पहिल्या दोन वनडे सामन्यांत हर्षित राणाचा (Harshit Rana) खेळ फारसा प्रभावी नव्हता. दुसऱ्या वनडेमध्ये हर्षितने 2 विकेट घेतल्या, पण त्याच वेळी तो महाग ठरला. अशा परिस्थितीत, हर्षितच्या जागी अंतिम वनडेमध्ये प्रसिद्ध कृष्णा (Prasiddh Krishna) खेळू शकतो. कृष्णा अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराजसोबत (Arshdeep singh & Mohmmed Siraj) मैदानात दिसू शकतो. सिराजने दुसऱ्या वनडेमध्ये फक्त एक विकेट घेतली, पण अर्शदीपने चांगली लय दाखवली आणि 2 महत्वाच्या विकेट्स घेतल्या.

टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11:
शुभमन गिल, रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल, कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी, प्रसीध कृष्णा, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.

Comments are closed.