कुंभमेळा आणि गुजरातमधील हॉस्पिटल व्हिडीओ लीकचे महाराष्ट्र कनेक्शन, दोघांना अटक

कुंभमेळ्यात महिलांचे कपडे बदलताना आणि गुजरातच्या हॉस्पिटलमध्ये काही महिलांचे खासगी व्हिडीओ लीक झाले होते. या प्रकरणाचा महाराष्ट्र कनेक्शनही समोर आले आहे. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असून दोन आरोपी हे महाराष्ट्रातले आहेत.

महाकुंभमध्ये महिला भाविकांचे कपडे बदलतानाचे आणि गुजरातमधील राजकोटच्या महिला रुग्णांचे व्हिडीओ काहीणीं युट्युब आणि टेलिग्राम चॅनेलवर अपलोड केले होते. या प्रकरणी गुजरात पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. यातील एक आरोपी उत्तर प्रदेशचा असून दोघे हे महाराष्ट्रातले आहेत. आरोपींनी गुजरातच्या 60-70 हॉस्पिटलमधले सीसीटीव्ही हॅक केले होते. या महिला स्त्री आरोग्य तज्ञानकडे चेकअपसाठी आले होते. तेव्हा या विकृत आरोपींनी सीसीटीव्ही हॅक करून हे फुटेज मिळवले आणि ते व्हायरल केले होते.

या प्रकरणी महाराष्ट्रातील दोघांना अटक करण्यात आली आहे. प्रयागराजचा युट्युबर चंद्रप्रकाश फुलचंदने आपल्या चॅनेलवर कुंभमेळ्यात स्नान करणाऱ्या महिलांचे 50-60 व्हिडीओ अपलोड केले होते. तर लातूरचा रहिवासी प्रज्वल तेली आणी संगलीचा प्राज पाटील यांना पोलिसांनी अटक केली आहे.

Comments are closed.