करेंगे दंगे चारो ओर… कुणाल कामराने पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांना डिवचले

विधानभवनात भाजप आमदार गोपिचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते भिडले. विधानभवनाच्या लॉबीमध्ये झालेल्या मारामारीचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत आहेत. यावरून कॉमेडियन कुणाल कामरा याने एक व्हिडीओ शेअर करत पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांना पुन्हा डिवचले आहे.
कुणाल कामराने कालच्या घटनेवर एक व्हिडीओ शेअर करत त्यावर एक गाणं लावलं आहे. त्यावर कुणालने ”लॉब्रेकर” (कायदे मोडणारे) असा एकच शब्द शेअर करत सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.
Comments are closed.