ब्रिटनमध्ये महिला खासदाराच्या पतीला अटक
लंडनमध्ये लेबर पार्टीच्या खासदार जोआनी रीड यांचे पती डेविड टेलर यांना चीनसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. टेलरसह तीन जणांना ब्रिटनमध्ये अटक करण्यात आली आहे. या सर्वांवर चीनसाठी हेरगिरी केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या घटनेने लंडनमध्ये एकच खळबळ उडाली आहे. खासदार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी या प्रकरणापासून आणि तपासापासून स्वतःला दूर ठेवले आहे. लंडनच्या मेट्रोपोलिटिन पोलिसांनी टेलर यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत ताब्यात घेतले आहे. मी आणि माझ्या मुलांचा पतीच्या कामात कोणताही सहभाग नाही, असे खासदार जोआनी रीड यांनी म्हटले आहे.
Comments are closed.