Ladki Bahin Yojana Beneficiary List Check : लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव हटवलं तर नाही ना? चेक करा!
राज्यातील सुमारे 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत. त्यामुळे आता अनेक लाडक्या बहिणींना प्रश्न पडलाय की आपलं नाव लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेच्या यादीत आहे की नाही, कारण अपात्र झाल्यावर 1500 रुपये मिळणार नाहीत.. आता हे नाव कसं चेक करायचं ते आपण जाणून घेऊयात…
– सर्वात आधी तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे.
– त्यानंतर इथे अर्जदार लॉगिन यावर क्लिक करायचं आहे.
-इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि खाली कॅप्चा कोड भरून सबमिट करायचं आहे.
-जर तुमच्याकडे पासवर्ड नसेल तर तुम्हाला फॉरगेट पासवर्डवर क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला मोबाईल नंबर आणि ओटीपी टाकून नवीन पासवर्ड टाकायचा आहे.
-त्यानंतर पुन्हा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करून घ्या.
-लॉगिन केल्यानंतर तुम्हाला Application Submited यावर क्लिक करायचं आहे
-जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तिथे Approved असं लिहून येईल.
किंवा तुम्ही हा व्हिडिओ पाहून देखील ही प्रोसेस करू शकता.
Comments are closed.