Ladki Bahin Yojana December installment will be available before New Year PPK


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळाले. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून येणारा हप्ता नियमीतपणे लाडक्या बहिणींच्या खात्यात जाणे, ही मोठी जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारवर आहे.

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळाले. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून येणारा हप्ता नियमीतपणे लाडक्या बहिणींच्या खात्यात जाणे, ही मोठी जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारवर आहे. आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात जुलै ते नोव्हेंबरपर्यंत 1500 रुपयांप्रमाणे 7500 रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे डिसेंबर महिन्याचा खाता नेमका कधी जमा होणार? असा मोठा प्रश्न लाडक्या बहिणींना असतानाच डिसेंबरचा हप्ता मिळण्यास आजपासून (मंगळवार, 24 डिसेंबर) सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आली आहे. (Ladki Bahin Yojana December installment will be available before New Year)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात भाषण करताना अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्कम जमा केली जाईल, असे म्हटले होते. त्यानुसार, या प्रक्रियेला आजपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे नववर्षाच्याआधीच लाडक्या बहिणींना आनंदवार्ता मिळणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता दोन टप्प्यात दिला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 2 कोटी 35 लाख महिलांना 1500 रुपयेप्रमाणे डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे. तर, विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी अखेरच्या टप्प्यात महिला व बाल कल्याण विभागाकडे 25 लाख महिलांचे अर्ज आले होते. त्या अर्जांची स्क्रुटिनी राहिली असल्याने ती पूर्ण करून या महिलांना देखील डिसेंबरचा हप्ता दुसऱ्या टप्प्यात दिला जाईल, अशी माहिती समोर आली आहे.

– Advertisement –

हेही वाचा… MHADA Lottery 2024 : म्हाडाकडून मुंबईकरांना आणखी एक संधी, कोकण मंडळातर्फे अर्ज करण्यास मुदतवाढ

महत्त्वाची बाब म्हणजे, महायुतीने विधानसभा निवडणुकीचा प्रचार करताना लाडकी बहीण योजनेची रक्कम 1500 रुपयांवरुन 2100 रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार 2100 रुपये कधीपासून मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, डिसेंबरचा हप्ता 1500 रुपयांप्रमाणे मिळणार आहे. पण देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर अर्थसंकल्पात याबाबत निर्णय घेतला जाईल, असे म्हटले होते. त्यानुसार अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरच महिलांना 2100 रुपयांचा हप्ता मिळू शकेल की नाही, याबाबतची माहिती स्पष्ट होईल. परंतु, अर्थसंकल्पापर्यंत महिलांना 1500 रुपयांप्रमाणेच हप्ता मिळणर आहे.


Edited By Poonam Khadtale



Source link

Comments are closed.