लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचे 344 कोटी वळवले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

‘लाडकी बहीण’ योजनेसाठी पुन्हा एकदा राज्य शासनाने सामाजिक न्याय विभागाचे 344.74 कोटी रुपये वळवले आहेत. लाभार्थी महिलांना मे महिन्याचा हप्ता देण्यासाठी ही रक्कम महिला व बालकल्याण विभागाच्या खात्यात वळती करण्यात आली आहे.

राज्य शासनाने आज यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला. यापूर्वीही अशाच प्रकारे सामाजिक न्याय विभागाचे, आदिवासी विकास विभागाचे हजारो कोटी रुपये या योजनेसाठी वळवले गेले आहेत. ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी स्वतंत्र निधीची तरतूद करायला पाहिजे होती; परंतु तसे न करता सरकार मागासवर्गीय आणि आदिवासींचा निधी या योजनेसाठी वापरत असल्याबद्दल समाजातून टीका होऊ लागली आहे.

Comments are closed.