Ladki Bahin Yojana January installment likely to arrive in the account before January 26
विधानसभा निवडणुकीनंतर डिसेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाला आहे. त्यानंतर आता जानेवारीचा हप्ता कधी जमा करण्यात येणार? असा प्रश्न उपस्थितीत होत असतानाच याबाबतची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून देण्यात आली आहे.
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळाले. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून येणारा हप्ता नियमीतपणे लाडक्या बहिणींच्या खात्यात जाणे, ही मोठी जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारवर आहे. विधानसभा निवडणुकीनंतर डिसेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाला आहे. त्यानंतर आता जानेवारीचा हप्ता कधी जमा करण्यात येणार? असा प्रश्न उपस्थितीत होत असतानाच याबाबतची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून देण्यात आली आहे. मंत्री आदिती तटकरे यांनी आज गुरुवारी (ता. 16 जानेवारी) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जानेवारीचा हप्ता कधी मिळणार याबाबतची माहिती दिली आहे. (Ladki Bahin Yojana January installment likely to arrive in the account before January 26)
मंत्री आदिती तटकरे प्रसारम माध्यमांसमोर म्हणाल्या की, 26 जानेवारीच्या आधी जानेवारी महिन्याचा लाभ मिळेल असा प्रयत्न सुरू आहे. यासाठी 3,690 कोटींचा निधी आम्हाला मिळणार आहे. अर्थसंकल्पाच्यावेळी देखील महिलांना लाभ कसा मिळेल? याची तरतूद आम्ही करणार आहोत. आम्ही फेब्रुवारीचे नियोजन सुद्धा करत आहोत. लाडकी बहीण योजनेचा लाभ आम्ही 2 कोटी 46 लाख महिलांना दिला. काही महिलांबाबत तक्रार आली होती. ड्युप्लिकेशन झालेल्या केसेस कमी होत्या. त्यामुळे फार काही फरक पडेल असे मला वाटत नाही. या महिन्यातील आकडा आधीसारखाच राहील, असे त्यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले.
हेही वाचा… शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यात येणार नाही; मुश्रीफांनी मुख्यमंत्र्यांना सुचवला नवीन पर्याय
तसेच, विरोधकांनी सुरुवातीपासूनच या योजनेवर टीका केली आहे. त्यांनी वेगवेगळे आरोपही केले आहेत. विरोधकांनी त्यांच्या जाहीरनाम्यात तीन हजार रुपये देण्याची घोषणा केली होती. ज्यावेळी एखादी युती किंवा आघाडी जाहीरनामा तयार करते, त्यावेळी त्यातील घोषणांच्या अधिन राहूनच सरकार काम करत असते. आमची महायुतीसुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. जास्तीत जास्त महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे यावेळी मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.
Comments are closed.