अजित पवारांची लाडक्या बहिणींना वॉर्निंग, ‘ही’ एक गोष्ट करावीच लागणार, अन्यथा 1500 रुपये बंद होण
Ladki Bahin Yojana KYC: “लाडकी बहीण” योजनेसाठी (Ladki Bahin Yojana) ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया आता बंधनकारक करण्यात आली आहे. ही योजना सुरु पासूनच विरोधकांनी या योजनेवर टीका करत ती सरकार निवडून आल्यानंतर बंद केली जाईल, असे भाकीत केले होते. मात्र, तसं घडलं नाही आणि योजना सुरूच राहिली. या योजनेबाबत विविध प्रकारचे आरोपही करण्यात आले. आता काही दिवसांपूर्वी या योजनेतील लाभार्थी महिलांसाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं अनिवार्य ठरवण्यात आलं आहे. मात्र, या प्रक्रियेदरम्यान अनेक महिलांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर केवायसीसाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. 2 महिन्यांचा कालावधी संपल्यानंतर ज्या महिला ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत. त्यांना लाडकी बहिण योजनेचा हप्ता मिळणार नाही. आता यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाष्य केलंय.
Ladki Bahin Yojana KYC: ‘ही’ एक गोष्ट करावीच लागणार
अजित पवार म्हणाले की, केवायसी करताना अडचणी येत आहेत. ऑगस्टमध्ये लाडकी बहीण योजना आणली तेव्हा सुरुवातीला काही गोष्टींमध्ये शिथिलता ठेवली होती. परंतु, आता हा निधी त्याच लाडक्या बहिणींना मिळेल जी पात्र लाभार्थी असेल. त्यासाठी आपण केवायसी करतोय. आपण मुदत वाढवायची असेल तर करु. पण केवायसी ही करावीच लागणार आहे. असे त्यांनी स्पष्ट केले.
Ajit Pawar on Anandacha Shidha: सगळ्या योजनांबाबत महायुती सरकार सकारात्मक
गेल्या वर्षीच्या दिपवाळीत ऐन निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने ‘आनंदाचा शिधा’ ही योजना सुरू केली होती. यावेळी मात्र निधीची चणचण हे कारण देऊन सरकारने ही योजना गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले की, काही योजना चालू असतात, सगळ्याचं कायम चालतात, असे नाही. त्या-त्या वेळची परिस्थिती लक्षात घेऊन काही बदल केले जातात. आता आनंदाचा शिधा ठराविक लोकांना मिळायचा. लाडकी बहीण योजनेचे पैसे जास्त लोकांना मिळतात. सगळ्या योजनांबाबत महायुती सरकार सकारात्मक आहे. काही योजना आल्यावर त्याचा उद्दिष्ट साध्य होत नसेल तर त्यामध्ये आपण बदल करत असतो. त्यानुसार आम्ही मार्ग काढत आहोत, असे देखील त्यांनी म्हटले.
https://www.youtube.com/watch?v=e8vlj_mzzj4
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.