Ladki Bahin Yojna and its impact on Teachers salary aditi tatkare clearifies asj
पुणे : राज्यातील शिक्षकांचा डिसेंबर महिन्याचा पगार उशिराने होण्याची शक्यता असल्याच्या बातम्या आल्यानंतर राज्यात विविध शिक्षक संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच, लाडकी बहीण योजनेमुळे शिक्षकांच्या पगाराला उशीर झाल्याच्या चर्चादेखील रंगल्या होत्या. यावर अखेर आता राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले असून या सर्व बातम्या खोट्या असल्याचे सांगितले. (Ladki Bahin Yojna and its impact on Teachers salary aditi tatkare clearifies)
हेही वाचा : Dhas Vs Mitkari : अमोल मिटकरींबद्दल प्रश्न विचारताच सुरेश धस भडकले; म्हणाले, “माझ्या…”
– Advertisement –
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला आलेल्या मंत्री आदिती तटकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना महत्त्वाची माहिती दिली. “लाडकी बहीण योजनेचा परिणाम हा दुसऱ्या कोणत्याही खात्यावर पडणार नाही. शिक्षकांचा पगार उशिरा होणार, लाडकी बहीण योजनेमुळे पगाराला उशीर होणार… ही अतिशय चुकीची माहिती आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनातच महिला व बालविकास विभागाला तब्बल 1400 कोटींचा निधी मिळाला आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा करण्यासाठी दुसऱ्या कोणत्याही विभागाचा निधी घेतलेला नाही.” असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
राज्यात सुरू असलेल्या महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवर मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, “या सर्व घटनांचा निषेध आहे. केंद्र सरकारने जे कायदे आणले आहेत, त्याच्यानुसार आता कडक कारवाई होईल,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील या सर्व घटनांमध्ये लक्ष ठेवलेले असल्याचेदेखील त्यांनी सांगितले. दरम्यान, शुक्रवारी (27 डिसेंबर) सकाळपासून शिक्षकांचा डिसेंबरचा पगार उशिरा होणार, कारण लाडक्या बहिणींसाठी तो निधी वापरण्यात आला अशा बातम्या येत होत्या. यावरून विविध शिक्षक संघटना आक्रमक झाल्या, तसेच त्यांनी प्रशासनाला इशारा दिला होता. ‘तुम्ही लाडकी बहीण योजना राबवा, नाहीतर दुसरे कोणतीही योजना राबवा, पण योग्य नियोजन करा. कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याचे वेतन रखडणार नाही, असे नियोजन करा अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषदेतेतील शिक्षकांनी दिली.
Comments are closed.