सर्वात जास्त प्रवासी
नवी दिल्ली
दिवंगत समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्या पत्नी आणि तत्कालीन जवाहरलाल नेहरू मंत्रिमंडळात असलेले हुमायून कबीर यांच्या कन्या लैला कबीर यांचे दिनांक १६ मे रोजी नवी दिल्लीतील निवासस्थानी निधन झाले. त्या ८८ वर्षांच्या होत्या . गेल्या दोन वर्षांपासून त्यांची कर्करोगाशी झुंज सुरु होती . लैला कबीर या आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात कार्यरत होत्या . रेडक्रॉस संघटनेतही त्या सक्रिय होत्या . कबीर यांच्या अंत्यसंस्काराला बिहारचे मुख्यमंत्री आणि फर्नांडीस यांचे दीर्घकाळचे सहकारी नितीशकुमार यांच्या वतीने संयुक्त जनता दलाचे नेते अनिल प्रसाद हेगडे , जदयूचे राष्ट्रीय सचिव मोहम्मद निसार , किसान संघर्ष समितीचे डॉ .सुनीलम आदी उपस्थित होते .
Comments are closed.