अंजली दमानिया सिलेक्टिव्ह राजकीय प्रकरणात लक्ष घालतात,नंतर फॉरेन टूर, प्रॉपर्टी..: लक्ष्मण हाके

लक्ष्मण हाक: अंजली दमानिया सिलेक्टिव्ह आहेत .राजकीय प्रकरणात लक्ष घालतात .(Anjali Damania)एक प्रकरण वाजलं की वर्षभर त्यांचं घर चालतं .सिलेक्टिव्ह प्रकरण वाजले की मग वर्षभर फॉरेन टूरला जातात आणि प्रॉपर्टी जमा करतात .ओबीसी दलितांच्या प्रकरणावर अंजली दमानीयांना वेळ नसतो,असा खळबळजनक आरोप ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केलाय .(Lakshman Hake)

संतोष देशमुख हत्या प्रकरणात कडाडून विरोध करणाऱ्या अंजली दमानियांनी गेल्या अनेक दिवसांपासून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे . धनंजय मुंडे यांचे कृषिमंत्री असतानाचे घोटाळे बाहेर काढत वाल्मिक कराडशी असणाऱ्या आर्थिक संबंधांवरही बोट ठेवत राजीनाम्याच्या मागणीचा दबाव वाढवला आहे .

दरम्यान,सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कैलास बोराडे नावाच्या व्यक्तीला पेटत्याचुलीतून रॉड टाकून भयानक पद्धतीने चटके दिल्याचे ट्विट केले.या ट्विटनंतर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी अंजली दमानिया सिलेक्टिव्ह राजकीय प्रकरणात लक्ष घालत असल्याचा गंभीर आरोप केलाय .

काय म्हणाले लक्ष्मण हाके?

‘अंजलीताईंच्या ट्विट बद्दल स्वागत करतो. पण सुप्रिया सुळे यांच्या मतदारसंघात एका नव बौद्ध युवकाने मराठा समाजातील मुलीशी विवाह केला म्हणून त्याची 22 वार करून हत्या करण्यात आली .मात्रा अंजली दमानिया यांनी या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही .लातूर जिल्ह्यात धनगर समाजाच्या युवकाची अमानुषपणे मारहाण करून हत्या करण्यात आली याही घटनेवर अंजनी या गप्प आहेत .जालन्यातील भोकरदन तालुक्यात एका धनगर समाजातील तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली .त्यावरही व्यक्त झाल्या नाहीत . मला वाटतं आपल्या भोकरदन तालुक्यातल्या गावांमध्ये येऊन या धनगर समाजाच्या तरुणांच्या कुटुंबीयांना तरुणांना भेटण्याचा मी त्यांना विनंती करेन . तुम्ही या प्रकरणांमध्ये लक्ष घाला आणि तुमचा जो सोशल वर्कर म्हणून जो दावा असतो नेहमी .. कोणाचंही त्या ऐकत नाहीत . तुम्ही वर्षभर रिकाम्या होता मग वर्षभर तुम्हाला जायचं असतं.

‘वर्षभर तुम्हाला प्रॉपर्टी काय करायचं असतं .वर्षभर तुम्हाला वेळ मिळत नाही . फक्त सिलेक्टिव्ह राजकीय प्रकरणांमध्ये दखल घेतात आणि प्रकरणात दखल घेतली तर पुन्हा वर्षभर त्यांचं घर चालतं . ठरवून प्रोग्राम करणारे त्यांचे वर्तन आहे . ओबीसीच्या किंवा दलितांचे प्रकरण असेल तर अंजलीताई दमानिया यांना वेळ नसतो . त्यांचं सामाजिक कार्य किंवा त्यांच्या तेथेच मध्ये बसतं असा आरोप ओबीसी आंदोलन लक्ष्मण हाके यांनी अंजली दमानिया यांच्यावर केला .

https://www.youtube.com/watch?v=kztxg2emes8

हेही वाचा:

Dhananjay Munde Resignation: धनंजय मुंडे फडणवीसांना भेटले, 15 मिनिटांत बाहेर पडले, राजीनाम्याचा निर्णय आजच होणार?

अधिक पाहा..

Comments are closed.