पुरंदर विमानतळासाठी 2832 हेक्टरचे भूसंपादन, एमआयडीसीकडून सात गावांना औद्योगिक क्षेत्राचा दर्जा
पुरंदर विमानतळाच्या जागेचे भूसंपादन महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियमानुसार करण्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार विमानतळासाठी त्यानुसार ठरल्याप्रमाणे सात गावांमधील सुमारे दोन हजार 832 हेक्टर जागा संपादित करण्यात येणार आहे. या गावांना औद्योगिक दर्जा देण्यात आला आहे. गावांमधील चतुः सीमाही निश्चित केल्या करण्यात आल्या आहेत.
पुरंदर तालुक्यातील वनपुरी, पारगाव मेमाणे, कुंभारवळण, एखतपूर, उदाचीवाडी, मुंजवडी, खानवडी या सात गावांमधील एकूण दोन हजार 832 हेक्टर जमिनीचे संपादन करण्यासाठी उद्योग विभागाने महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियमानुसार हे क्षेत्र निश्चित केले आहे.
या गावांना आता औद्योगिक क्षेत्राचा दर्जा देण्यात आला असून, रस्ते, पाणंद, ओढे या जागाही संपादित केल्या जाणार आहेत. या सर्व सात गावांमधील चतुः सीमाही निश्चित केल्या असून, या जमिनींवर ‘एमआयडीसी’चे शेरे मारण्यात येणार आहेत.
विमानतळाच्या जागेच्या भूसंपादनाबाबत एमआयडीसी व महसूल विभागाच्या बैठकीत कार्यपद्धती निश्चित करण्यात येईल. त्यानंतर हरकती व सूचना मागविल्या जातील. त्यासाठी एक महिन्याचा कालावधी असेल. विमानतळाची घोषणा ऑक्टोबर 2016 मध्ये झाली, तेव्हापासून जागेचा घोळ सुरू आहे
पुरंदर विमानतळाची नेमकी जागा कोणती, याबद्दलची कोणतीही माहिती सरकारने अद्यापि आम्हाला दिलेली नाही. सर्वसहमतीने हा विमानतळ व्हावा, याबद्दल आमची सहकार्याची भूमिका राहणार आहे. स्थानिक शेतकरी आणि गावकरी यांचा मान-सन्मान ठेवून सर्वांना विश्वासात घेऊन सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा.
सुप्रिया सुळे, खासदार
Comments are closed.