राजौरी येथे नियंत्रण रेषेजवळ भूसुरुंग स्फोट

राजौरी

जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेनजीक मंगळवारी भूसुरुंगाचा स्फोट झाला आहे. या स्फोटामुळे 4 सैनिक जखमी झाले आहेत. ही घटना राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरच्या अंतर्गत येणाऱ्या कलाल येथे घडली आहे. सैन्याची एक तुकडी नियमित गस्त घालत असताना भूसुरुंगाचा हा स्फोट झाला आहे. स्फोटाचा आवाज ऐकताच अन्य सैनिकांनी तेथे धाव घेत मदतकार्य केले, जखमी सैनिकांना रुग्णालयात हलविण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Comments are closed.