Bhandup Landslide – भांडुपच्या खिंडीपाडा भागात दरड कोसळली, पाच घरांचे नुकसान

मुंबईसह उपनगरात गेल्या आठवड्याभरापासून पावसाने जोर धरला आहे. या मुसळधार पावसामुळे डोंगराळ, टेकड्यांवरील भागांना मोठा फटका बसला आहे. अशातच भांडुपच्या खिंडीपाडा भागात ओमेगा हायस्कूलच्या मागे मंगळवारी दरड कोसळ्याची घटना घडली. येथे संरक्षक भीतिसह सुमारे पाच घरे 50 फुटांवरून खाली कोसळली आहे. दरम्यान या दुर्घटनेत कोणतीही जीवित्तहानी झालेली नाही.
भांडुपच्या खिंडीपाडा भागात दरड कोसळली, पाच घरांचे नुकसान#bhanduplandslide pic.twitter.com/tflyfcp54d
– सामाना ऑनलाईन (@सॅमानाऑनलाइन) 23 जुलै 2025
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी 5 च्या सुमारास ही घटना घडली. भांडुपच्या खिंडीपाडा भागात डोंगरावर रहिवाशी वस्ती आहे. दिवसभर वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे मंगळवारी संध्याकाळी या भागात पाच घरांसह दरड कोसळली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पावसाळ्यात डोंगराळ भागात दरड कोसळ्याची भीती असल्यामुळे तेथील अनेक घरे आधीच रिकामी करण्यात आली होती. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस, महानगर पालिकेचे अधिकारी आणि अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोतल्या. यांनतर त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता तातडीने आजूबाजूच्या परिसरातील लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन केले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतिचे वातावरण तयार झाले आहे.
Comments are closed.