सोनप्रयाग-गौरीकुंड मार्गावर दरड कोसळली; यात्रेकरू अडकले.
वृत्तसंस्था/ केदारनाथ
केदारनाथ यात्रेदरम्यान मंगळवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे सोनप्रयाग-गौरीकुंड मार्गावर तीन ठिकाणी भूस्खलन झाले आहे. यामुळे यात्रेच्या मार्गात अडथळे निर्माण झाले. तर भूस्खलनानंतर जिल्हा प्रशासन, एनडीआरएफ, एसडीआरएफ, पोलीस आणि अन्य मदतपथकांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले.
स्थितीवर सातत्याने नजर ठेवत यात्रामार्ग लवकरात लवकर सुरू करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. प्रशासनाच्या पथकांनी प्रतिकूल परिस्थितीतही केवळ 30 मिनिटांमध्ये चालत जाणाऱ्या भाविकांसाठी मार्ग खुला करत त्यांना सुरक्षित स्थानी पोहोचविण्याचे कार्य केले आहे. रात्रभर चाललेल्या अभियानादरम्यान भाविकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राथमिकता देण्यात आली. केदारनाथ धाम यात्रेत 19 मेपर्यंत 6 लाख 94 हजारांहून अधिक भाविकांनी श्री केदारनाथ दर्शन घेतले आहे.
Comments are closed.