अब्जाधीशांमध्ये लॅरी एलिसन दुसरे

ब्लूमबर्गच्या अब्जाधीशांच्या यादीत मोठा बदल दिसून येत आहे. टेस्लाचे इलॉन मस्क यांच्या नंबर वन पदाला धोका बनलेले लॅरी एलिसन अब्जाधीशांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत. काही दिवसांपूर्वी लॅरी एलिसन यांना गुगल अल्फाबेटचे सहसंस्थापक सर्गेई ब्रिन यांनी चौथ्या नंबरवर ढकलले होते. टॉप 10 अब्जाधीशांच्या यादीत इलॉन मस्क पहिल्या क्रमांकावर आहेत. ब्ल्यूमबर्गच्या अहवालानुसार, हिंदुस्थानचे उद्योगपती मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. गुरुवारी त्यांच्या संपत्तीत एक अब्ज डॉलरची वाढ झाली. जागतिक स्तरावर अंबानी 106 अब्ज डॉलर संपत्तीसह 18 व्या स्थानावर आहेत.

शीर्षस्थानी 10 अब्जाधीश

इलॉन मस्क        467 अब्ज डॉलर

लॅरी एलिसन        274 अब्ज डॉलर

लॅरी पेज     272 अब्ज डॉलर

सेर्गे ब्रिन 253 अब्ज डॉलर्स

जेफ बेजोस  251 अब्ज डॉलर

मार्क झुकेरबर्ग      234 अब्ज डॉलर

बर्नार्ड अर्नॉल्ट 202 अब्ज डॉलर्स

स्टिव बाल्मर       167 अब्ज डॉलर

Gensheng हुआंग 159 अब्ज डॉलर्स

वॉरेन बफे   151 अब्ज डॉलर

Comments are closed.