पाकिस्तानात ‘लश्कर’चा टॉप कमांडर युसूफ आफ्रिदीचा खात्मा , अज्ञात हल्लेखोरांकडून बेछूट गोळीबार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पाकिस्तानात अज्ञात हल्लेखोरांनी लश्कर-ए-तोयबा’चा टॉप कमांडर शेख युसूफ आफ्रिदी याचा आज गोळय़ा घालून खात्मा केला. तो खैबर पख्तुनख्वा भागात लश्करचा म्होरक्या होता. या वर्षी अज्ञात हल्लेखोरांनी 30 पेक्षा जास्त टॉप कमांडरचा खात्मा केला आहे. त्यामुळे या अज्ञात हल्लेखोरांनी दहशतवाद्यांमध्ये भीती निर्माण केली आहे.

युसूफ आफ्रिदी हा मुंबईवर झालेल्या 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा अतिशय विश्वासू होता. प्राप्त माहितीनुसार, अज्ञात हल्लेखोरांनी युसूफवर बेछूट गोळीबार केला. त्यातून त्याला वाचण्याची संधीच मिळाली नाही. या हत्येची कोणत्याही संघटनेने जबाबदारी घेतलेली नाही. मात्र, अज्ञात हल्लेखोरांमुळे पाकिस्तानी लष्कर आणि गुप्तचर यंत्रणांचे धाबे दणाणले आहे. काही दिवसांपूर्वीच हाफिज सईदचा आणखी एक सहकारी आमिर हमजा याचाही लाहोरमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून खात्मा केला होता.

Comments are closed.