Latur News क्रेटा कारची ट्रकला पाठीमागून धडक, भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू

च्या
​अहमदपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. 361 वर गुरुवारी पहाटे एक भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या हुंडाई क्रेटाने एका ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, क्रेटा कार अक्षरशः ट्रकच्या मागील भागात घुसली, यात कारमधील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला.
च्या
​मिळालेल्या माहितीनुसार, क्रेटा कारमधील चालक ​रविकुमार तुकाराम दराडे (वय 20 वर्षे, रा. कराड नगर, अहमदपूर) व त्याचा मित्र ​सागर दिलीप ससाने (वय २० वर्षे, रा. फतेपूर, अहमदपूर) दोन्ही तरुण शिरूर ताजबंद येथून जेवण करून अहमदपूरकडे भरधाव वेगाने येत होते. दरम्यान, त्याच रस्त्यावरून नांदेड कडे जाणाऱ्या ट्रकला त्यांच्या कारने पाठीमागून जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आणि ती पूर्णपणे ट्रकच्या खाली गेली. अपघातामुळे ट्रकचेही मोठे नुकसान झाले असून, मागील चार टायर तुटून पडल्याचे पोलिसांनी सांगितले.
च्या
​अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी क्रेटा कारचा वेग 120 ते 140 किमी प्रतितास असण्याची शक्यता वर्तवली आहे. कार ट्रकखाली दबल्याने क्रेनच्या साहाय्याने कार बाहेर काढून मृतदेह बाहेर काढण्यात आले. दोन्ही मृतांचे मृतदेह शासकीय ग्रामीण रुग्णालय, अहमदपूर येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले व त्यानंतर ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

​या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांनी तातडीने आपल्या सहकाऱ्यांसह अपघातस्थळी धाव घेतली. त्यांनी मदत कार्य करून वाहतूक सुरळीत केली. ​याप्रकरणी ट्रकचालक मुनीर चुन्नुमीया पाशा यांच्या फिर्यादीवरून अहमदपूर पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. ७९५/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम १०६ (१), २८१, ३२४ (४) (५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक श्रीमंगल यांच्याकडे गुन्ह्याचा पुढील तपास सोपवण्यात आला आहे.

Comments are closed.