लोटूर न्यूज – खाजगी बाली आउट; गाड्या, रोड डिशची दुकाने, घरगुती स्टोअर्स, घर जळत

लातूर जिल्ह्यातील औसा येथे शुक्रवारी सकाळी खासगी बसला भीषण आग लागली. पुण्याहून लातूरकडे येणाऱ्या ‘लोटस ट्रॅव्हल्स’च्या बसला ही आग लागली असून या आगीत बसमधील प्रवाशांचे सामान, रस्त्याच्या कडेचे दुकान आणि घर जळून खाक झाले. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले असून आगीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘लोटस ट्रॅव्हल्स’ची बस पुण्याहून प्रवाशांना घेऊन लातूरच्या दिशेने मार्गस्थ झाली होती. मात्र सकाळच्या सुमारास औसा येथे आल्यानंतर बसचे टायर फुटले आणि आग लागली. क्षणार्धात या आगीने भीषण रुप धारण केले आणि अख्खी बस जळून खाक झाली. सुदैवाने आगीने रौद्ररुप घेण्याआधीच आतील प्रवाशांना बाहेर काढण्यात आले.
दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि आग विझवली. मात्र तोपर्यंत बस पूर्ण जळून खाक झाली होती. या आगीत प्रवाशांचे मौल्यवान सामान, रस्त्याच्या कडेचे दुकान आणि घर जळून खाक झाले. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले. घटनास्थळी बघ्यांचीही गर्दी झाली होती.
लातूर जिल्ह्यातील औसा येथे खासगी बसला भीषण आग; प्रवाशांचे सामान, रस्त्याच्या बाजूचं दुकान, घर जळून खाक pic.twitter.com/dsfrbpgci6
– सामाना ऑनलाईन (@सॅमानाऑनलाइन) 15 ऑगस्ट, 2025
Comments are closed.