लातूरमध्ये ऑपरेशन लोटस, काँग्रेसला मोठा धक्का, अमित देशमुखांचे विश्वासू नगरसेवक भाजपच्या गळाला
लातूर बातम्या : लातूर (Latur) शहर आणि जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात असला तरी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील गळती वाढताना दिसत आहे. भाजपात सर्व पक्षांतून प्रवेश सुरू असून काँग्रेस यात आघाडीवर आहे. आज लातूर शहरात भाजपात मोठ्या प्रमाणात इन्कमिंग झालं. काँग्रेसचे चार टर्म नगरसेवक रविशंकर जाधव, स्वीकृत नगरसेवक पुनीत पाटील आणि गनिमी कावा संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत जोगदंड यांनी भाजपात प्रवेश केला आहे.
दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये पक्ष प्रवेश होत असल्याचं चित्र
भाजपाचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर आमदार अभिमन्यू पवार आमदार रमेश कराड जिल्हाध्यक्ष माजी आमदार बसराज पाटील मुरूमकर, भाजप नेत्या अर्चना पाटील चाकूरकर यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे चार टर्म नगरसेवक रविशंकर जाधव, स्वीकृत नगरसेवक पुनीत पाटील आणि गनिमी कावा संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत जोगदंड यांनी भाजपात प्रवेश केला आहे. या पक्ष प्रवेशामुळं महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा हादरा बसला आहे. दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये पक्ष प्रवेश होत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे.
महानगर पालिका निवडणुकांच्या तोडांवर काँग्रेसला मोठा धक्का
काँग्रेसचे चार टर्म नगरसेवक रविशंकर जाधव, स्वीकृत नगरसेवक पुनीत पाटील आणि गनिमी कावा संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत जोगदंड यांनी भाजपात प्रवेश केला आहे. काँग्रेस आमदार अमित देशमुख यांचे विश्वासू मानले जाणारे रविशंकर जाधव यांचा भाजपमध्ये झालेला पक्ष प्रवेश हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, याआधी माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे व उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला होता. काँग्रेसमधील ही सुरू असलेली पडझड आगामी निवडणुकीत कोणाच्या फायद्याची ठरेल, हे निकालानंतर स्पष्ट होईल. दरम्यान आज भाजपमध्ये झालेल्या पक्ष प्रवेशाचा काँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काँग्रेसला आत्मचिंतन करण्याची गरज, त्यांच्याकडे कार्यकर्ते टिकत नाही, संभाजी पाटील निलंगेकरांचा टोला
भाजपवर विश्वास ठेवून मोठ्या प्रमाणात इन्कमिंग होत आहे. आम्ही कोणत्याही भाजपाच्या त्या प्रभागातील नेतृत्वाला कार्यकर्त्याला न दुखावता पक्षप्रवेश देत आहोत. काँग्रेसला आत्मचिंतन करण्याची गरज आहे. कारण त्यांच्याकडे कार्यकर्ते टिकत नाहीत असा खोचक टोला आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी कार्यक्रमानंतर लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या:
पुण्यानंतर ठाणे महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या प्रस्तावावर शरद पवार गट सकारात्मक
आणखी वाचा
Comments are closed.