हळदी-कुंकवाचा कार्यक्रम झाला, मात्र घरी आल्याच नाहीत, लातूरमध्ये काँग्रेस उमेदवाराचे अपहरण?

लातूर काँग्रेस बातम्या : लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील तांबळा जिल्हा परिषद गटातून एसटी प्रवर्गातील काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार अंजना चौधरी यांचा अपहरण झाल्याचा संशय काँग्रेस कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. प्रचारासाठी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आटोपून त्या घराबाहेर पडल्या होत्या. मात्र त्यानंतर त्या घरी परत न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांसह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या प्रकरणी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन अपहरणाचा संशय व्यक्त करत लेखी निवेदन दिले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्यास केवळ दोन दिवस शिल्लक असताना ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.

आणखी वाचा

Comments are closed.