NEET(UG)-2026 पेपर फुटबॉल लातूर कनेक्शन; पोलीस अधीक्षकांचे चौकशीचे आदेश
लातूरमधील खाजगी शिकवणी चालकाचा नीट पेपर फुटीचे सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. एका विद्यार्थ्याचा पालकाच्या तक्रारी वरून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
दिनांक 12/05/2026 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय लातूर येथे एका विद्यार्थिनीचे पालक यांनी प्रत्यक्ष हजर येऊन तक्रार दिली की, NEET(UG)-2026 चा पेपर होण्यापूर्वी लातूर येथील एका क्लासेसने एक मॉक टेस्ट पेपर त्यांच्या क्लासेसच्या विद्यार्थ्यांना दिला. त्या पेपरमधून 42 प्रश्न हे NEET(UG)-2026 या पेपर मध्ये जशाच्या तसे आलेले होते.
NEET(UG)-2026 ही झालेली परीक्षा पेपर फुटी मुळे शासनाने रद्द केली आहे. त्याअनुषंगाने लातूर येथील क्लासेसचा या पेपर फुटीच्या प्रकरणांमध्ये समावेश असल्याची शक्यता तक्रारी मध्ये नमूद केले आहे. तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी समीरसिंह साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर यांना सदर अर्जाच्या अनुषंगाने त्वरित चौकशी करून दोषी विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
लातूर जिल्ह्यामध्ये NEET(UG)-2026 पेपर फुटीच्या अनुषंगाने आपल्याकडे काही महत्त्वाची माहिती व पुरावे असल्यास आपण उपविभागीय पोलिस अधिकारी शहर समीरसिंह साळवे (9145119049)यांना संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Comments are closed.