शेती विकू न दिल्याच्या रागातून आईला संपवलं, मृतदेह पोत्यात भरून शेतात पुरला अन् स्वतः ….
व्यापक गुन्हा: तीन महिन्यांपूर्वी मुलीचे लग्न झालं. आता झालेलं कर्ज फेडण्यासाठी शेती विकण्याचा पर्याय मुलाने आईला सुचवला मात्र 70 वर्षाच्या आईने मुलास विरोध करत शेती विकू दिली नाही. याचा राग मनात धरून मुलाने आईला गळा आवळून संपवलं. त्यानंतर शेतीतील उसात मृतदेह पुरला. नंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार लातूर जिल्ह्यातून समोर आला आहे. रेणापूर तालुक्यातील सांगवी येथे याप्रकरणी मृत मुलावर कुणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. (Latur Crime News)
नेमकं प्रकरण काय?
काकासाहेब वेणुनाथ जाधव असे 48 वर्षीय मृत मुलाचे नाव आहे. मुलास वडिलोपार्जित 8 एकर शेती असून काही दिवसांपूर्वी त्याच्या वडिलांचे निधन झाले. चार बहिणी नंतर जन्मलेल्या एकुलता एक मृत आरोपी काकासाहेब यांना दोन मुली आणि दोन मुले आहेत. तीन महिन्यांपूर्वी त्यांनी मोठ्या मुलीचं लग्न लावून दिलं. पण या लग्नात झालेला कर्ज फेडण्यासाठी वडिलोपार्जित थोडीशी शेती विकावी असा सल्ला त्याने आई समिंदराबाई वेळूणात जाधव यांना दिला. परंतु पतीच्या माघारी मी जमीन विकू देणार नाही असे सांगत त्याला आईने विरोध केल्यामुळे संतापाच्या भरात मुलाने आईचा खून करून मृतदेह पोत्यात बांधला. उसाच्या शेतात खड्डा करून आईचा मृतदेह पुरला. त्यानंतर शेतापासून आठ किलोमीटर दूर जाऊन बाभळीच्या झाडाला गळफास घेत त्याने स्वतःच आयुष्य संपवलं.
आईला संपवलं नंतर आत्महत्या
काकासाहेब जाधव यांनी रेणापूर फाटा येथे मोकळ्या जागेत बाभळीला गळफास घेतल्याचे आढळून आल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर रेणापूरचे पोलीस निरीक्षक तातडीने घटनास्थळी पोहोचले. अधिक तपास केला असता मृत काकासाहेब जाधव याची आई आणि पत्नी ही गायब असल्याचे लक्षात आलं. त्यामुळे शोध घेतल्यानंतर उसाच्या फडात एका ठिकाणी माती उखरल्याचा आढळून आले. तिथे खोदल्या असता आधी एक पोते निघाले नंतर त्या पोत्यात केस दिसले. हे पोते बाहेर काढले असता काकासाहेब जाधव यांची आई समिंदराबाई जाधव यांचा मृतदेह आढळून आला, असे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी सांगितले.
आणखी वाचा
Comments are closed.