दीड दमडीचा वकील, जा कुठं जायचंय तिथं जा; वाहतूक महिला पोलिसाचा आणखी एक व्हिडिओ
लातूर : गेल्या 24 तासांपासून व्हायर झालेल्या लातूर (Latur) शहरातील वाहतूक शाखेच्या महिला कॉन्स्टेबलचा (Police) आणखी एक ऑन फायर व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये, एका वकिलासोबत या पोलिस महिलेचा वाद पाहायला मिळत आहे. आपल्याला दीड दमडीचा वकील संबोधल्याने वकीलाने नाराजी व्यक्त केली. त्यानंतर, व्हिडिओ शूट करताना जा तुला कुठं जायचंय तिथं जा.. असे म्हणत प्रणिता मुसने यांनी वकिलासह त्याच्या साथीदाराला चांगलंच सुनावलं आहे. वाहतुकीचे नियम मोडल्यावरुन दोघांमध्ये वाद झाल्याचं व्हायरल व्हिडिओतील (Viral video) संभाषणावरुन दिसून येते. सोमवारी याच महिला पोलिसाने ट्रिपल सीट फिरणाऱ्या, बेदरकारपणे स्कुटी चालवणाऱ्या तीन मुलींना चांगलच झापलं होतं.
वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या वकिलाला महिला पोलीस प्रणिता मुसने यांनी चांगलच सुनावलं आहे. दीड दमडीचा वकील या वाक्यावरुन वकील आणि कॉन्स्टेबल यांच्यातील बाचाबाची सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं पाहायला मिळत आहे. लातूरमधील या महिला कॉन्स्टेबलने सोमवारी दुपारी स्कुटीवर बेफाम असणाऱ्या तीन तरुणींना चांगलंत सुनावलं होतं, विशेष म्हणजे त्यांना मारहाण देखील केली होती. मात्र, घडल्या प्रकाराबद्दल त्यांनी आज माफी मागत विषय संपवला होता. पण, त्या तीन मुलींनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात महिला कॉन्स्टेबल प्रणिता मुसने यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. मुलींचा हा विषय संपतो न संपतो तोच प्रणिता मुसने यांचा दुसरा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे हा नवीन व्हिडिओ ही काल संध्याकाळचा आहे.
सोमवारी संध्याकाळी कर्तव्यावर असताना प्रणिता मुसने यांनी वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या वकिलांचा चांगलाच क्लास लावला. मोटर सायकलवर ट्रिपल सीट असणाऱ्या वकिलाला कॉन्स्टेबल प्रणिता मुसने यांनी अडवलं, त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यावरुन, पोलीस कॉन्स्टेबल प्रणिता मुसने यांनी दीड-दमडीचा वकील असा उल्लेख करत वकिलाला वाहतुकीचे नियम समजावून सांगितले. या दोघांमधील हा सर्व राडा सुरू असताना पोलीस कर्मचारी आणि प्रत्यक्षदर्शी असणाऱ्या लोकांनी मोबाईल कॅमेऱ्यामध्ये सर्व घटनाक्रम कैद केला. त्यानंतर, आज हा दुसरा व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे. त्यावरुन, अनेकजण मुसने यांच्या स्वभावाबद्दल भाष्य करत आहेत. तर, अनेकजण वकिलांना ट्रिपलसीट फिरण्याची परवानगी कोणी दिली, वकिलांनाच कायदे, नियम कळत नाहीत का, असा प्रश्न उपस्थित करत आहेत.
हेही वाचा
मोठी बातमी! लातूरमधील नारायणा इ-टेक्नो स्कुलला ठोकलं टाळं; लाखो रुपये फी भरलेले पालक चिंतेत
आणखी वाचा
Comments are closed.