लातूरच्या खरोसा डोंगरात दिसला बिबट्या, वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल

लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील ऐतिहासिक खरोसा गावच्या डोंगराळ भागात बिबट्या दिसला आहे. विशेष म्हणजे, एका शेतकऱ्याने या बिबट्याला शिकारीसह प्रत्यक्ष पाहिल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.”
च्या
खरोसा गावाभोवती असलेल्या चार डोंगररांगांपैकी पश्चिम दिशेला असलेल्या डोंगरावर आज संध्याकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. शेतकरी संजय शेषेराव तोडकर हे आपल्या शेतातून काम संपवून घराकडे परतत होते. डोंगर माथ्यावरील हनुमान मंदिराजवळ आले असता, अवघ्या दहा फुटांच्या अंतरावर त्यांना एका हिंस्त्र प्राण्याचे दर्शन झाले.
“सुरुवातीला तो प्राणी रानडुक्कर असावा असा संशय तोडकर यांना आला. मात्र, नीट खात्री केली असता, तोंडात भक्ष पकडलेला तो पूर्ण वाढ झालेला बिबट्या असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. बिबट्याला इतक्या जवळून पाहिल्याने तोडकर यांची घाबरगुंडी उडाली. त्यांनी तातडीने ही माहिती गावकऱ्यांना दिली.”
च्या
“बिबट्या दिसल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच खरोसा ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या भागातील अनेक शेतकऱ्यांची शेती डोंगराच्या पश्चिम दिशेला असून, त्यांना दररोज याच मार्गाने ये-जा करावी लागते. आता या बिबट्यामुळे शेतात जावे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.”
च्या
वनविभागाची कारवाई
घटनेचे गांभीर्य ओळखून वनविभागाचे पथक तातडीने सतर्क झाले आहे. वनपाल पांडुरंग चिले यांच्या मार्गदर्शनाखाली अभिमन्यू जाधव, राम जाधव, सचिन फावडे, हणमंत माने, संतोष धुमाळ आणि सौदागर जाधव हे कर्मचारी डोंगराभोवती तळ ठोकून आहेत. बिबट्याचा शोध घेण्यासाठी आणि ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी वनविभागाकडून विशेष मोहीम राबवण्यात येत असल्याची माहिती कर्मचारी अभिमन्यू जाधव यांनी दिली आहे.
च्या
प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रात्रीच्या वेळी एकटे बाहेर पडू नका आणि काही संशयास्पद हालचाल दिसल्यास तातडीने वनविभागाशी संपर्क साधावा अशा सूचना करण्यात आले आहेत.

Comments are closed.