Latur news – जून महिन्यात वाहून गेलेला पूल आजही त्याच अवस्थेत, औसा येथे जाण्यासाठी घालावा लागतोय सात किमीचा वळसा

औसा तालुक्यातील मौजे शिंदाळा (ज), जमालपूर हासाळा येथून तालूक्याचे ठिकाण असलेल्या औसा येथे जाणारा रस्त्यावरील पूल जून महिन्यात वाहून गेला. जवळपास चार महिने होऊन सुद्धा अजुनही याची दखल कोणी घेतली नसल्याने तो आजही आहे त्याच अवस्थेत आहे. त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांनाही तब्बल सात किलोमीटर दूर अंतरावरून आता फिरून औसा येथे जावे लागत असल्याने त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
Comments are closed.