Latur News – लातूर जिल्ह्यातील 43 मार्गावरील रस्ते वाहतूक बंद, जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या 110.9 टक्के पावसाची नोंद

जिल्ह्यातील तब्बल 43 मार्गावरील रस्ते वाहतूक आज बंद करण्यात आली आहे. आजपर्यंत लातूर जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या 110.9 टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील 10 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात पूर आला असून अनेक संसार, जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेले. अतिवृष्टीमुळे लातूरमधील नद्या, ओढे, धरणे ओसंडून वाहत आहेत. यामुळे नद्यांवरील पूल, रस्ते पाण्याखाली गेले असून 43 मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
22 सप्टेंबर रोजी लातूर जिल्ह्यामध्ये सरासरी 35.3 मिमी पाऊस झाला आहे. सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत अपेक्षित पर्जन्यमानाच्या तुलनेत (138.8 मिमी सरासरी) प्रत्यक्षात 224.5 मिमी पाऊस झाला आहे. 1 जूनपासून आतापर्यंतचा पाऊस अपेक्षित पर्जन्यमानाच्या (663.8 मिमी) तुलनेत 783.0 मिमी म्हणजेच 118.0 टक्के इतका पाऊस झाला. लातूर जिल्ह्यात वार्षिक सरासरी (जून ते सप्टेंबर) 706.00 मिमीच्या तुलनेत 783.0 मिमी म्हणजेच 110.9 टक्के इतक्या पावसाची नोंद झाली.
Comments are closed.