Latur News – फरशी सुकवण्यासाठी कूलर लावत होती, वीजेचा शॉक लागल्याने भावी वधूचा मृत्यू

लातूरमधील अहमदपूरमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. आठवडाभरानंतर तरुणीचा विवाह होणार होता. मात्र नियतीच्य मनात काहीतरी वेगळंच होतं. घरात साफसफाई करताना वीजेचा शॉक लागून वधूचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. तर जाधव आणि जळकोट कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सुषमा जाधव असे मयत तरुणीचे नाव आहे.

सुषमा बीएससी ग्रॅज्युएट असून तिचा आत्याच्या मुलासोबत 20 मे रोजी विवाह होणार होता. गेल्या आठवड्यात दोघांचा साखरपुडा पार पडला होता. लग्नाला आठवडा बाकी असल्याने सुषमा घरात साफसफाई आणि फरशी धुवत होती. फरशी धुतल्यानंतर ती सुकण्यासाठी सुषमा कूलर लावत होती. मात्र कूलर लावताना तिला वीजेचा शॉक बसला आणि जागीच तिचा मृत्यू झाला. सुषमाच्या अकस्मात मृत्यूने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सायंकाळी अत्यंत शोकाकुल वातावरणात सुषमावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Comments are closed.