Latur News – मांजरा नदीवरील पुल पुराच्या पाण्याखाली, दहा गावातील वाहतूक ठप्प

शिरुर अनंतपाळ ते निलंगा जाणाऱ्या रस्त्यावरील बाकली-बसपूर येथील मांजरा नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे. यामुळे दहा गावातील वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून बस सेवाही बंद करण्यात आली आहे.
मंगळवारी (28 ऑक्टोबर 2025) झालेल्या पावसामुळे नदीपात्रात अधिक पाणी वाहत आहे. त्यामुळे मांजरा नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे मांजरा नदीवरील बसपूर-बाकली पुलावरून पाणी वाहत आहे. आज (29 ऑक्टोबर) सायंकाळी पाच वाजल्यापासून हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. यामुळे साकोळ, सांगवी, घुग्गी, राणी अंकुलगा, बाकली, बिबराळ, बसपूर, खडक उमरगा, केळगाव, लांबोटा, निलंगा बससेवा बंद करण्यात आली आहे.

Comments are closed.