Latur News – जिल्ह्यातील 29 मंडळात अतिवृष्टी, मागील 24 तासांत सरासरी 62 मिलीमीटर पावसाची नोंद
लातूर जिल्ह्यात गणेशाच्या आगमनासोबतच पावसाचेही जोरदार आगमन झाले आहे. जिल्ह्यातील नदी, नाले, ओढे भरभरून वाहत आहेत. जिल्ह्यातील २९ मंडळात अतिवृष्टी झाली आहे. तब्बल ३९ रस्ते बंद झाले. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसाचे पाणी तुंबल्याने शाळा, ग्रामपंचायत कार्यालये, शेतीला तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे.
Latur News – मांजरा नदीचे पाणी पात्राबाहेर, नदीचे रौद्र रूप पाहून धडकी भरतेय
जिल्ह्यातील २९ मंडळात अतिवृष्टी झाली. यामध्ये लातूर मंडळात ६६ मि.मी., हरंगुळ मंडळात ७८.५ मि.मी., कासारखेडा मंडळात ६९.८ मि.मी., कन्हेरी मंडळात ७८.५ मि.मी., लामजना मंडळात ७२.५ मि.मी., किनी मंडळात १०२.८ मि.मी., किल्लारी मंडळात ७२.५ मि.मी., अहमदपूर मंडळात ६८.३ मि.मी., खंडाळी मंडळात ६८.३ मि.मी., शिरूर ताजबंद मंडळात ७१.५ मि.मी., हडोळती मंडळात ७१.५ मि.मी., पानचिंचोली मंडळात ६७ मि.मी., निटूर मंडळात ६६ मि.मी., मदनसुरी मंडळात ६८.८ मि.मी., उदगीर मंडळात ८५.८ मि.मी., नागलगाव मंडळात ८९ मि.मी., वाढवणा मंडळात ८४ मि.मी., नळगीर मंडळात ७६.५ मि.मी., मोघा मंडळात ११०.८ मि.मी., हेर मंडळात ८१.५ मि.मी., देवर्जन मंडळात ८१.५ मि.मी., तोंडार मंडळात ८५.८ मि.मी., रेणापूर मंडळात ७६.८ मि.मी., पानगाव मंडळात ७१ मि.मी., देवणी मंडळात ७०.८ मि.मी., शिरूर अनंतपाळ मंडळात ७०.३ मि.मी., हिसामाबाद मंडळात ९०.५ मि.मी., जळकोट मंडळात ७९.३ मि.मी., घोणसी मंडळात ७६.५ मि.मी. पाऊस झाला.
Latur News – मुसळधार पावसामुळे लातूर जिल्ह्यातील 39 मार्गांवरील वाहतूक प्रभावित
24 तासांत सरासरी 62 मि.मी. पावसाची नोंद
जिल्ह्यात २८ ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत सरासरी ६२.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये जळकोट तालुक्यात सर्वाधिक ७७.७ मिलीमीटर तर उदगीर तालुक्यात सर्वात कमी ५० मिलीमीटर पाऊस झाला आहे.
तालुकानिहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे –
लातूर-६० मि.मी., औसा-५७.३ मि.मी., अहमदपूर-६२.९ मि.मी., निलंगा-५० मि.मी., उदगीर- ८६.९ मि.मी., चाकूर-५१.७ मि.मी., रेणापूर-६४.९ मि.मी., देवणी-५९.२ मि.मी., शिरूर अनंतपाळ-७२.७ मि.मी. आणि जळकोट-७७.९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तसेच २९ महसूल मंडळात ६५ मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.
Comments are closed.