लातूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपाच्या उषा पाटील तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे दयानंद सुरवसे यांची निवड

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

लातूर जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी आज निवडणूक घेण्यात आली. अध्यक्षपदी महायुतीतील भाजपाच्या उषा संभाजीराव पाटील तळेगावकर यांची तर उपाध्यक्षपदी महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजीत पवार गटाचे दयानंद दामोदर सुरवसे हे निवडून आले आहेत. प्रत्यक्ष मतदानात महायुतीच्या अध्यक्ष पदाच्या व उपाध्यक्ष पदाच्या उमेदवारास प्रत्येकी ३४ मते मिळाली. तर महाविकास आघाडीच्या दोन्ही पदाच्या उमेदवारास प्रत्येकी २५ मते मिळाली. या दोन्ही पदासाठी मतदान झाले.

महायुतीतील सर्व सदस्य हे ट्रॅव्हल्स मधून दाखल झाले होते. सदर निवडणूक ही बिनविरोध होऊ शकली नाही. छाननीनंतर महाविकास आघाडीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष या पदासाठी प्रत्येकी दोघांनी माघार घेतली त्यानंतर अध्यक्षपदी महायुतीच्या उषा संभाजीराव पाटील व महाविकास आघाडीच्या दिपाली शामराव भोसले यांच्यात लढत झाली. उपाध्यक्ष पदासाठी महायुतीचे दयानंद दामोदर सुरवसे महाविकास आघाडीच्या नागेश्वरी सचिन केंद्रे यांच्यामध्ये लढत झाली. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी प्रत्येकी ३४ मते घेतली तर विरोधी उमेदवारांना प्रत्येकी २५ मते मिळाली.

Comments are closed.