खिशातून गोळी लागल्याने वकिलाचा मृत्यू
कोट्टायम:
केरळच्या कोट्टायम येथे सोमवारी रात्री एक स्कूटर पलटली, यादरम्यान स्कूटर चालविणाऱ्या इसमाच्या पँटच्या खिश्यात ठेवलेल्या बंदुकीतून गोळी झाडली गेली आणि यामुळे त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. मृत इसमाचे नाव ओक्कट्टू जोबी असून तो पेशाने वकील होता. स्कूटर चालवताना जोबीने नियंत्रण गमाविले होते. यादरम्यान त्याची स्कूटर पलटली होती. तर जोबीच्या खिशयात ठेवलेल्या बंदुकीची गोळी झाडली गेली, जी त्याच्या डोक्यात शिरली.
Comments are closed.