गज्या मारणेच्या वकिलांनी कोर्टात पोलिसांचीच तक्रार केली, तोंडावर काळा कपडा बांधून…
<पी शैली ="मजकूर-संरेखित: न्याय्य;">पुणे : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला मारणे टोळीतील गुंडांनी 19 फेब्रुवारीला शिवजयंतीच्या दिवशी मिरवणुकीवेळी मारहाण केल्यानं गुंड गजा मारणेच्या अडचणी वाढल्याचं चित्र आहे. शिवजयंतीच्या दिवशी केंद्रीय मंत्री मुरलधीर मोहोळ यांचा कार्यकर्ता देवेंद्र जोग याला गुंड गजा मारणेच्या टोळीतील काही लोकांकडून मारहाण करण्यात आली होती. या मारहाण करणाऱ्यांपैकी तिघांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती. या प्रकरणात गुंड गजा उर्फ गजानन मारणे याला देखील पोलिसांनी काल (सोमवारी) अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गजानन मारणेला आज पुण्यातील शिवाजीनगर कोर्टासमोर हजर करण्यात आलं आहे. 3 मार्चपर्यंत गजानन मारणेला पोलीस कोठडी कोर्टाकडून सुनावण्यात आली आहे.
पोलिसांनी प्रेशर मध्ये येऊन काम…
यावेळी गजानन मारणेला पुण्यातील शिवाजीनगर कोर्टासमोर हजर करण्यात आला आहे. यावेळी मारणेच्या वकिलांनी जोरदार युक्तीवाद केला आहे. गजानन मारणे यांच्या वकिलांचा युक्तिवाद करताना म्हटलं की, माझ्या क्लाइंटला खाली मांडी घालून बसवलं आणि फोटो व्हायरल केला. हा अत्यंत बालिशपणा आहे. फरार आरोपी हजर होतं नाही म्हणून यांना पकडण्यात आलं आहे. पोलिसांनी प्रेशर मध्ये येऊन काम केलं आहे. या प्रकरणात 307 कलम कसं काय लागू होऊ शकतं? काल पर्यंतच्या रिमांड कॉपीमध्ये असा उल्लेख केला आहे की, ए त्या माणसाला मारा असं कुठेही नाहीये. नाकावर फ्रॅक्चर असल्यावर 307 कलम कसं लागू होऊ शकतं. या वातावरणात माझ्या क्लाइंटला कसं अडकवण्यात येईल याचा प्रयत्न केला आहे, असा युक्तीवाद मारणेच्या वकिलांनी केला आहे.
चेहऱ्याला न झाकता फोटो व्हायरल करण्यात आला
मी रिट पेटिशन देखील दाखल करणार आहे. तोंडावर काळा कपडा बांधून नेण्यात येतं, खाली बसवून फोटो व्हायरल करण्यात येतो. पोलिसांकडे कुठलाही पुरावा नाही. गजा मारणे हा शुगर पेशंट आहे. पोलिसांनी फोटो व्हायरल केला, चेहऱ्याला न झाकता फोटो व्हायरल करण्यात आला आहे, अशी तक्रार गजा मारणेच्या वकिलाची कोर्टाकडे केली आहे.
तर सहाय्यक पोलीस आयुक्तत गुन्हे शाखा (investigation officer) गणेश इंगळे यांनी माहिती देताना सांगितलं आरोपी विरोधात 28 गुन्हे दाखल आहे. त्याची पुणे शहरात दहशत आहे. सखोल तपास करण्यासाठी कस्टडी असणं अत्यंत महत्वाची आहे. सीसीटीव्ही CCTV फुटेज आहे, त्याचाही सखोल तपास करायचा आहे, त्यावरती मजा मारणेच्या वकीलांनी युक्तिवाद करताना मला सीसीटीव्ही फुटेज दाखवावं, असं म्हटलं आहे, तर सीसीटीव्ही नसेल तर ऑडियो क्लिप ऐकवावी ज्यात म्हणलं आहे, त्याला मारा असा जोरदार युक्तीवाद गजा मारणेच्या वकीलांनी केला आहे. न्यायालयाने युक्तीवाद ऐकल्यानंतर गजानन मारणे याला पुणे न्यायालयाने 3 मार्च पर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. सहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Comments are closed.