दिग्गज क्रिकेटरचा धक्कादायक निर्णय! अचानक घेतला संन्यास, BCCI वर वर्णभेदाचा गंभीर आरोप
लक्ष्मण शिवरामकृष्णन बीसीसीआय समालोचनातून निवृत्त: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) वर सध्या रंगभेदाचे गंभीर आरोप समोर आले आहेत. हे आरोप भारताचे माजी क्रिकेटपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन (Laxman Sivaramakrishnan) यांनी केले आहेत. शुक्रवारी त्यांनी बीसीसीआयच्या समालोचन (Commentary) पॅनलमधून निवृत्ती जाहीर केली. त्यांनी सांगितले की, गेल्या 23 वर्षांत त्यांना टॉस अनाउन्समेंट किंवा प्रेझेंटेशनसारख्या महत्त्वाच्या क्षणांमध्ये कधीच संधी देण्यात आली नाही. उलट आजच्या नव्या समालोचकांना टॉस रिपोर्ट आणि पिच रिपोर्टसारख्या जबाबदाऱ्या दिल्या जात आहेत, असे त्यांनी नमूद केले.
जर माझा 23 वर्षांपासून टॉस आणि प्रेझेंटेशनसाठी वापर झाला नसेल आणि शास्त्री कोचिंग करत असतानाही नवीन खेळाडू आले तर टॉस प्रेझेंटेशनचा अहवाल द्या, तर तुम्हाला काय कारण वाटतं?
— लक्ष्मण शिवरामकृष्णन (@LaxmanSivarama1) 20 मार्च 2026
BCCI वर वर्णभेदाचा गंभीर आरोप; क्रिकेटविश्व हादरलं (Laxman Sivaramakrishnan Retires from BCCI Commentary)
विशेष म्हणजे, त्यांनी थेट बीसीसीआयवर रंगभेदाचा आरोप केला नव्हता. मात्र त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टवर एका युजरने “हे कदाचित तुमच्या त्वचेच्या रंगामुळे होत असेल” अशी टिप्पणी केली. यावर प्रतिक्रिया देताना शिवरामकृष्णन यांनीही याबाबत सहमती दर्शवली आणि कदाचित त्यांना रंगभेदामुळेच या संधी मिळाल्या नसाव्यात, असे संकेत दिले. यानंतर हा वाद अधिकच चिघळला.
मी बीसीसीआयच्या समालोचनातून निवृत्ती घेत आहे
— लक्ष्मण शिवरामकृष्णन (@LaxmanSivarama1) 20 मार्च 2026
या प्रकरणावर रविचंद्रन अश्विनची प्रतिक्रिया
दरम्यान, भारताचा माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) यानेही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी खेद व्यक्त करत सांगितले की, यंदाच्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये लक्ष्मण शिवरामकृष्णन समालोचक म्हणून दिसणार नाहीत, ही खंतजनक बाब आहे.
लक्ष्मण शिवरामकृष्णन यांचे करिअर कसे होते? (Laxman Sivaramakrishnan Career)
60 वर्षांचे लक्ष्मण शिवरामकृष्णन हे भारताचे माजी लेग-स्पिन गोलंदाज असून त्यांनी क्रिकेटनंतर समालोचक म्हणूनही मोठी ओळख निर्माण केली. ते जवळपास दोन दशकं कमेंट्री बॉक्समध्ये सक्रिय होते. त्यांनी 1983 ते 1986 दरम्यान भारतासाठी 9 कसोटी आणि 16 एकदिवसीय सामने खेळले. त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात थोडी साधी झाली, पहिल्या कसोटीत त्यांना एकही विकेट मिळाली नाही. मात्र त्यानंतर त्यांनी जोरदार पुनरागमन करत 1984 साली इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत तब्बल 12 बळी घेत आपली क्षमता सिद्ध केली. 2000 मध्ये त्यांनी समालोचन क्षेत्रात पदार्पण केले आणि पुढे ते आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध समालोचक बनले. ते आयसीसीच्या क्रिकेट समितीत खेळाडूंचे प्रतिनिधी म्हणूनही कार्यरत होते.
1985 च्या बेन्सन अँड हेजेस स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी
1985 साली ऑस्ट्रेलियात झालेल्या अँड हेजेस स्पर्धेत शिवरामकृष्णन यांनी अफलातून कामगिरी केली. सुनील गावसकरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करत विजेतेपद पटकावले. या विजयानंतर शिवरामकृष्णन हे संघाचे खरे हिरो ठरले. अंतिम सामन्यात त्यांच्या प्रभावी गोलंदाजीमुळे प्रतिस्पर्धी संघाला 9 बाद 176 धावांपर्यंतच मर्यादित ठेवता आले. संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा मानही त्यांनी पटकावला.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.