इराणमधील भारतीयांनी तात्काळ देश सोडण्याचा सल्ला दिला

इराणमधील भारतीयांना तातडीने देश सोडण्याचा सल्ला

भारताने इराणमध्ये वास्तव्यास असलेल्या स्वतःच्या नागरिकांना तेथून लवकरात लवकर बाहेर पडण्याची सूचना केली आहे. तेहरानमधील भारतीय दूतावासाने यासंबंधी एक दिशानिर्देश जारी केले आहेत. अमेरिका आणि इराणदरम्यान युद्धविरामाच्या घोषणेनंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.

क्षेत्रातील सुरक्षास्थितीची अनिश्चितता पाहता लवकरात लवकर इराणमधून बाहेर पडण्याचा सल्ला तेहरानमधील भारतीय दूतावासाने बुधवारी तेथे असलेल्या भारतीय नागरिकांना दिला आहे. कुठल्याही स्थितीत पूर्व मंजुरीशिवाय सीमेवर स्वतंत्र स्वरुपात प्रवास करणे टाळण्यावर दिशानिर्देशात जोर देण्यात आला आहे.

अमेरिका आणि इराणदरम्यान २ आठवड्यांच्या युद्धविरामाची घोषणा करण्यात आली असून त्यात अनेक विरोधाभास आहेत.युद्धविरामाच्या घोषणेतच अमेरिका आणि इराणकडून करण्यात आलेले दावे हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत.
होर्मुझ सामुद्रधुनीवरून दोघांकडून वेगवेगळी माहिती देण्यात आल्याने युद्धविरामावरून साशंकता निर्माण झाली आहे.युद्धविरामात ज्याप्रकारे चीनकडून मध्यस्थ म्हणून पाकिस्तानचा चेहरा पुढे करण्यात आला ते पाहता अनेक शंका उपस्थित.
युद्धविरामाला अमेरिका स्वतःचा विजय ठरवतोय, तर इराण अमेरिकेला गुडघ्यावर आणल्याचा दावा करत आहे. युद्धविरामाच्या घोषणेनंतरही इराणने ‘आमची बोटं अद्याप ट्रिगरवरच आहेत’ अशी धमकी दिल्याने तणाव कायम राहणार.

पूर्वी बाहेर न पडण्याचा सल्ला….

भारतीय दूतावासाने पूर्वीच्या दिशानिर्देशात इराणमधील भारतीय नागरिकांना ४८ तासांपर्यंत घरात राहण्याचा सल्ला दिला होता.
दूतावासाकडून हे दिशानिर्देश अमेरिकेकडून इराणमध्ये मोठ्या हल्ल्याची डेडलाइन देण्यात आल्यावर देण्यात आले होते.
इलेक्ट्रीकसुविधा अन् सैन्य तळांपासून दूर राहण्याची सूचना दूतावासाकडून भारतीयांना विशेष स्वरुपात करण्यात आली होती.
बहुमजली इमारतींमध्ये राहत असल्यास वरच्या मजल्यापासून अंतर राखण्याची सूचना भारतीय दूतावासाकडून करण्यात आली होती.
कुठल्याही महामार्गावर जाणार असल्यास दूतावासाकडून माहिती मिळवून प्रवास सुरू करण्याची सूचना दूतावासाने केली होती.

सहाय्यासाठी आपत्कालीन सुविधा-

इराणमधील भारतीय दूतावासाने आपत्कालीन संपर्क क्रमांकही जारी केले आहेत.
९८९१२८१०९११५
९८९१२८१०९१०२
९८९१२८१०९१०९
९८९९३२१७९३५९
तर या cons.tehran@ mea.gov.in. ईमेल आयडीवर सहाय्यासाठी संपर्क करण्याची सूचना करण्यात आली आहे.

Comments are closed.