विधान परिषद उपसभापती आज निवडणूक, शिवसेनेकडून ज. मो. अभ्यंकर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी आज 1 जुलै रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून आमदार ज. मो. अभ्यंकर यांनी आज निवडणूक अधिकारी विलास आठवले यांच्याकडे अर्ज दाखल केला आहे, तर शिंदे गटाकडून उपसभापती पदासाठी आमदार सचिन अहिर यांनी अर्ज दाखल केला आहे.

विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी सभापती राम शिंदे यांनी सोमवारी निवडणूक जाहीर केली. आज दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत होती. यानुसार सकाळी आमदार अंबादास दानवे, काँग्रेस आमदार अभिजित वंजारी यांच्या उपस्थितीत ज. मो. अभ्यंकर यांनी उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केला. 1 जुलै रोजी दुपारी 1 वाजता ही निवडणूक होणार आहे.

असे आहे संख्याबळ

विधान परिषदेचे संख्याबळ पाहता एकूण 78 सदस्यांपैकी राज्यपाल नियुक्त पाच सदस्यांच्या जागा रिक्त आहे. तर सध्याच्या संख्याबळानुसार भाजपचे 35, शिंदे गट 11, अजित पवार गट – 10, काँग्रेस 5, शिवसेना  – 5, राष्ट्रवादी काँग्रेस – 2 तर अपक्ष – 4 आमदार असे संख्याबळ आहे.

Comments are closed.