‘लेजा लेजा’ फेम नीना सरकार आता काय करते? 17 व्या वर्षी स्टारडम… आज आहे एका कंपनीची सीईओ

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

2006 सालच्या ‘लेजा लेजा रे’ या गाण्यातील बस स्टॉपवर बसलेली निरागस मुलगी आणि तिचे बोलके डोळे आजही अनेकांच्या स्मरणात आहेत. श्रेया घोषाल आणि उस्ताद सुलतान खान यांच्या आवाजातील या गाण्याने इंडिपॉप संगीताचे एक युग गाजवले होते. या गाण्यातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री नीना सरकार तब्बल दोन दशकांनंतर पुन्हा एकदा चर्चेत आली असून तिची सध्याची कारकीर्द सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

जेव्हा नीना सरकारने ‘लेजा लेजा रे’ हे गाणं केलं होतं, त्यावेळी ती केवळ 17 वर्षांची होती. त्या गाण्याच्या चित्रीकरणावेळी तिच्या नैसर्गिक सौंदर्याला अधिक उठाव देण्यासाठी विशेष कॉन्टॅक्ट लेन्स आणि हेअर एक्सटेन्शन्सचा वापर करण्यात आला होता. या गाण्यामुळे तिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली, मात्र त्यानंतर तिने ग्लॅमरच्या जगापासून लांब राहणे पसंत केले. या प्रदीर्घ विश्रांतीनंतर आता नीना यांनी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून पुनरागमन केले असून त्यांच्या चाहत्यांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले आहे.

आज नीना सरकार ही ओळख केवळ एक माजी म्युझिक व्हिडिओ स्टार इतकीच मर्यादित राहिलेली नाही. ती आता बंगळुरूमध्ये स्थायिक असून एका नामांकित कंटेंट सोल्युशन्स फर्मची संस्थापक आणि सीईओ म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. व्यावसायिक यशासोबतच ती प्राणी कल्याणाच्या कार्यातही सक्रिय असून भटक्या प्राण्यांच्या मदतीसाठी नेहमीच पुढाकार घेते. आयुष्यातील साधेपणा जपण्यासाठी ती दीर्घकाळ कॅमेऱ्यापासून दूर राहिली, तसेच 9 एप्रिल 2026 रोजी या गाण्याला 20 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताच जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला.

Comments are closed.