लिंबू, नारळ, फुलं अन्… बारामतीतल अजित पवारांच्या घराजवळ जादूटोण्याचा प्रयत्न? चर्चांना उधाण


बारामती: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या बारामतीतील सहयोग सोसायटी या घरापासून काही अंतरावर फुटपाथवर लिंबू, नारळ आढळून आले (Ajit Pawar House Black Magic) आहेत. सकाळी फिरायला गेलेल्या नागरिकांना ते पाहायला मिळाले. त्यावेळी सजग नागरिकांनी ते बाजूला काढून टाकले. आता हा जादूटोणा आहे का? की अन्य काही अशी चर्चा बारामतीत रंगली आहे.(Ajit Pawar House Black Magic)

बारामतीतील अजित पवारांच्या निवासस्थानाजवळ असलेला हा जो रस्ता आहे तो बारामतीतला प्रमुख रस्त्यांपैकी एक मानलो जातो. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या (Ajit Pawar House Black Magic) निवासस्थानापासून अवघ्या काही अंतरावरती हा प्रकार आहे तो समोर आलेला आहे. फुटपाथवर लिंबू आणि नारळ दिसून आले, सकाळच्या सुमारास नागरिक मोठ्या संख्येने मॉर्निंग वॉकसाठी त्या परिसरात जातात, त्यावेळी काही सजग नागरिकांच्या ते लक्षात आलं. त्यावेळी त्यांनी ते सर्व बाजूला काढून टाकलं, मात्र हा जो प्रकार आहे तो जादूटण्याचा प्रकार आहे की वेगळा काही आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. असे प्रकार होणे धक्कादायक आहे, पोलिसांकडे या घटनेबाबत कोणतीही माहिती नाहीये. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानापासून अवघ्या काही अंतरावरती हा प्रकार घडलेला आहे.(Ajit Pawar House Black Magic)

या घटनेनंतर परिसरात विविध अंदाजांना उधाण आले असून, स्थानिक पातळीवरही चर्चा रंगत आहे. काही रहिवाशांचे म्हणणे आहे की, उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळ अशा प्रकारे लिंबू-नारळ ठेवले जाणे सामान्य नसून, हा कुणाच्या अंधश्रद्धेचा किंवा दिष्ट टाकण्याच्या हेतूने केलेला प्रकार असू शकतो. तर काहींचा अंदाज आहे की हे जादूटोण्याचे स्वरूप नसून, कुणी तरी विनाकारण टाकलेले पदार्थ असण्याची शक्यता आहे. घटनेच्या संवेदनशीलतेला पाहता नागरिकांनी पोलिसांनी परिसरात सीसीटीव्ही फूटेज तपासावे, तसेच अशी सामग्री तिथे कशी आणि कोणी आणली याचा तपास करावा, अशी मागणी सुरू केली आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या घराजवळ असा प्रकार घडल्याने अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.

आणखी वाचा

Comments are closed.