Lemon Pickle Recipe: तेल न वापरता १० मिनिटांत बनवा रसाळ लिंबाचे लोणचे, चव कधीच विसरणार नाही

जेवणाच्या ताटात लोणचे असेल तर चार घास जास्त. त्यामुळे काहींना जेवताना लिंबू किंवा कढीपत्ता लोणची लागते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना लोणचे खायला आवडते. आंबट चविष्ट लोणच्यासोबत भाकरी, चपाती किंवा डाळभात सोबत खातात. लोणचे बनवण्यासाठी विविध मसाल्यांचा वापर केला जातो. उन्हाळा सुरू झाल्यानंतर सर्वांत आधी लोणचे आणि पापड घरीच केले जायचे. तेल आणि मसाल्यांचा वापर करून लोणचे बनवले जाते. पण आज आम्ही तुम्हाला तेल न वापरता लोणची बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. अशा प्रकारे लोणची वर्षभर जपून ठेवली जाते आणि चवीलाही छान लागते. कोणत्याही वेगळ्या पद्धतीचा वापर न करता अगदी सोप्या पद्धतीने बनवलेले लोणचे खूप सुंदर लागते. पारंपारिक पदार्थाची चव खूप सुंदर आहे. चला तर मग जाणून घेऊया तेल न वापरता लोणचे बनवण्याची सोपी रेसिपी.(छायाचित्र सौजन्य – istock)

होळी 2026: होळी स्पेशल पारंपारिक थंडाई रेसिपी! आता घरीच बनवा शरीराला थंडावा देणारे सुगंधी पौष्टिक पेय

साहित्य:

  • लिंबू
  • साखर
  • मीठ
  • लाल मिरची
  • काश्मिरी लाल मिरची

कृती: कंटाळवाणे जेवण क्षणात बनवा मजेदार, घरीच बनवा गव्हाच्या पिठाचे पापड

कृती:

  • लिंबाचे लोणचे बनवण्यासाठी प्रथम लिंबू स्वच्छ पाण्याने धुवा. नंतर लिंबू सुती कापडाने वाळवा.
  • सुकल्यानंतर चाकूच्या मदतीने लिंबाचे चार तुकडे करा. लिंबू खूप बारीक करू नका.
  • लिंबू कापल्यानंतर त्यातील बिया हलक्या हाताने काढून टाका. चिरलेल्या लिंबाचे तुकडे कुकरमध्ये वाफवून घ्या.
  • शिजलेले लिंबू पूर्णपणे थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक वाटून घ्या. नंतर रस गाळून घ्या.
  • एका भांड्यात लिंबाचा रस, साखर, मीठ, लाल मिरची आणि काश्मिरी लाल मिरची एकत्र करून बाजूला ठेवा.
  • त्यानंतर तयार मिश्रण कढईत ओतून घट्ट होईपर्यंत शिजवा. शिजवलेले लोणचे थंड करून काचेच्या बरणीत भरा.
  • साध्या पद्धतीने बनवलेले लिंबाचे लोणचे तयार आहे.

Comments are closed.