चंद्रपुरात काकासमोरच पुतण्याला बिबट्याने पळवले; मुलाचा शोध सुरू

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी येथे घरासमोर काकासोबत उभ्या असलेल्या एका सात वर्षांच्या मुलाला बिबट्याने उचलून नेल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी घडली आहे. प्रशिक बबन मानकर (७) असे त्या मुलाचे नाव आहे. मानकर यांच्या घरामागे एक टेकडी आहे. तिथे झुडपे तयार झाली आहे. तिथे बिबट्या दबा धरून बसला होता.

प्रशिक हा काकासोबत गावातील मस्कन्या गणपतीच्या जेवणासाठी गेले होते. तेथून घराकडे परतत असताना अचनाक त्यांच्यासमोर बिबट्या आला. त्याने काकासमोरच प्रशिकवर झडप घातली आणि प्रशिकला तोंडात पकडून टेकडीवरील झुडपात नेले. काही समजण्याच्या आतच बिबट्याने धूम ठोकली. प्रशिकच्या काकाला बिबट्याचा प्रतिकार करण्याची संधीच मिळाली नाही. घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर वनविभागाचे पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे. टेकडी परिसरात प्रशिकचा शोध घेण्यात येत आहे. मुलाचे काही कपडे आणि परिसरात रक्ताचे डाग आढळले आहेत. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comments are closed.