चला AI साठी UPI सारखे व्यासपीठ विकसित करूया
केंद्रीय मंत्री वैष्णव यांचे प्रतिपादन : 200 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची अपेक्षा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी इंडिया एआय इम्पॅक्ट समिटला संबोधित करताना भारताच्या एआय आणि डीप-टेक इकोसिस्टीममध्ये जागतिक गुंतवणुकदारांची रुची वेगाने वाढत असल्याचा दावा केला. पुढील दोन वर्षांमध्ये देशात 200 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक गुंतवणूक येण्याची अपेक्षा असल्याचे म्हणत वैष्णव यांनी ‘एआयचा यूपीआय’ विकसित करण्याच्या योजनेची घोषणा केली. हे एक एक विश्वसनीय तांत्रिक उपायांचा समूह असेल. ही एक यूपीआयसारखी ओपन प्लॅटफॉर्म व्यवस्था असेल, ज्यावर डेव्हलपर्स आणि कंपन्या विविध एआय उपाय तयार करू शकतील असे वैष्णव यांनी सांगितले आहे.
Nvidia CEO चे स्पष्टीकरण
एनवीडियाचे सीईओ जेनसन हुआंग हे परिषदेत सामील झाले नाहीत. याबद्दल वैष्णव यांनी स्पष्टीकरण दिले आहे. हुआंग यांनी वैयक्तिक स्वरुपात संपर्क साधत स्वत:च्या अनुपस्थितीला अनिवार्य कारणांशी जोडले आहे आणि स्वत:च्या जागी एका वरिष्ठ अधिकाऱ्याला पाठविले आहे. एनवीडिया भारतीय कंपन्यांसोबत एआय क्षेत्रात मोठ्या गुंतवणुकीवर काम करत असल्याचा दावा वैष्णव यांनी केला आहे.
एआय स्टेकचे 5 लेयर्स
एआय स्टेकचे 5 लेयर्स इन्फ्रास्ट्रक्चर, कंप्यूट, डाटा, मॉडेल आणि अॅप्लिकेशनमध्ये गुंतवणुकीच्या शक्यता निर्माण करत आहेत. गुंतवणुकीसोबत वेंचर कॅपिटलकडून डीप-टेक फंडिग आणि भारताच्या डिजिटल सार्वजनिक अवसंरचनाही (डीपीआय) जागतिक रुचीचे प्रमुख कारण आहे. पंतप्रधानांच्या नेतृत्वात विकसित डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरमुळे भारतात लोकसंख्येच्या स्तरावर तांत्रिक उपायांचा विस्तार वेगाने शक्य आहे, यामुळे एआयचा प्रसार आणि वापर आणखी वेगवान होणार असल्याचे उद्गार अश्विनी वैष्णव यांनी काढले आहेत.
जगभरातील सीईओंची भारताकडे नजर
जगभरातील सीईओ विशेष स्वरुपात भारतीय डीप-टेक स्टार्टअप्स, इन्फ्रास्ट्रक्चर आणि मोठ्या प्रमाणावर सोल्युशन विकसित करण्याच्या क्षमतेवरून उत्साहित आहेत असा दावा त्यांनी केला. परिषदेवरून युवा आणि संशोधकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. वैष्णव यांच्यानुसार 3 लाखाहून अधिक युवा, संशोधक आणि विद्यार्थी या परिषदेसाठी नोंदणीकृत झाले असून बहुतांश सत्र पूर्णपणे भरलेली आहेत. एआयचा वापर अर्थव्यवस्था आणि समाजाच्या मोठ्या समस्यांवरील उपायांसाठी केला जावा, तसेच तंत्रज्ञानामुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानाला नियंत्रित करणेही आवशयक असल्याचे वैष्णव यांनी नमूद केले.
संभाव्य दुरुपयोग रोखण्यावर मंथन
30 देशांच्या मंत्र्यांसोबत मीडिया क्षेत्रात एआयच्या संभाव्य दुरुपयोग रोखण्यावर गंभीर मंथन होत आहे. डीपफेक आणि सिंथेटिक कंटेंट लोकशाही, रचनात्मक उद्योग आणि माहितीच्या विश्वसनीयतेसाठी मोठा धोका ठरू शकतात. याचमुळे याचे नियंत्रण आणि जबाबदार वापरावर जागतिक स्तरावर सहकार्य आवश्यक असल्याचे वैष्णव यांनी सांगितले आहे.
Comments are closed.