Let’s learn about the ways to protect ourselves from this disease in the context of National Dengue Day
मुंबई : दरवर्षी 16 मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा केला जातो. डेंग्यू झाल्यास आपण या आजाराचा सामना कसा करू शकतो? याविषयी जनजागृती केली जाते. यावर्षी राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा करताना या खास दिवसाबद्दल काही गोष्टी आणि उपाय जाणून घेऊया… (Let’s learn about the ways to protect ourselves from this disease in the context of National Dengue Day)
येत्या काही दिवसांत पावसाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर सगळीकडे साथीच्या आजारांचा संसर्ग वाढण्यास सुरुवात होईल. कारण पावसाळा सुरू झाल्यानंतर वातावरणात मोठ्याप्रमाणात बदल होत असतात. या बदलांशी आपल्या शरीराला जुळवून घ्यावे लागते. जेव्हा शरीर या बदलांना प्रतिकूल प्रतिसाद देते तेव्हा ताप, सर्दी, खोकला यांसारख्या सामान्य आजारांचा सामना करावा लागतो. याशिवाय पावसाळ्यात जंतू आणि विषाणूपासून होणाऱ्या आजारांचा धोकाही वाढतो. मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया सारख्या तापाच्या साथीमुळे दरवर्षी भारतात हजारो लोकांचा मृत्यू होतो. त्या आजारांना व्हायरल इंफेक्शन असे म्हटले जात असून जे एडीस एजिप्टी नामक डासांमुळे पसरतात. हे डास घरगुती वातावरणात आणि आजूबाजूच्या परिसरात साचलेल्या पाण्यात अधिक वाढतात. त्यामुळे डेंग्यू या आजारापासून वाचण्यासाठी आणि त्यावर उपाय काय करू शकता? ही सर्व माहिती देण्यासाठी विविध जनजागृती करण्यात येते.
डेंग्यू आजारावर उपचार काय?
डेंगी हा विषाणूजन्य आजार आहे, जो एडिस डास चावल्याने होतो. एडिस डासाने चावा घेतल्यानंतर 4 ते 10 दिवसांत लक्षणे दिसू लागतात. थंडी वाजून ताप, डोकेदुखी, अंगदुखी, सांध्यात वेदना, मळमळ, सूज व त्वचेवर चट्टे यासारखी लक्षणे असतात. काही रुग्णांत डेंग्यू रक्तस्रावी ताप (DHF) दिसतो. यामध्ये हिरड्या/नाकातून रक्तस्त्राव व त्वचेखाली लाल चट्टे दिसतात. डेंग्यूवर कोणतेही विशिष्ट औषध नसून केवळ लक्षणांवर आधारित उपचार केले जातात. त्यामुळे लक्षणे आढळल्यास त्वरित महानगरपालिका आरोग्य केंद्र, दवाखाना, रुग्णालय किंवा कुटुंबाच्या वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
हेही वाचा – BMC : साथीचे आजार रोखण्यासाठी मुंबई महापालिका सरसावली; डासांची तब्बल 2 लाख उत्पत्ती स्थाने नष्ट
घरातून डेंग्यूच्या डासांना घालवण्यासाठी काही सोपे उपाय
कॉफीचा स्प्रे : आजच्या काळात क्वचितच एखादं घर असेल जिथे कॉफी मिळत नाही. कॉफी जितकी लोकांना आवडते तितकीच ती डासांसाठी नावडती असते. घरातील डासांना घालवण्यासाठी एक बाटली पाणी घ्या व त्यात 1 चमचा कॉफी मिसळा. स्प्रे बॉटलसारखं झाकण असलेली बाटली अधिक चांगली. यानंतर कॉफीच्या स्प्रेने तुम्हाला थोड्याच वेळात डासांपासून मुक्तता मिळू शकते. घराच्या आजूबाजूला किंवा जिथे जास्त पाणी साचलंय तिथे तुम्ही कॉफी पावडर टाकून डासांचा नाश करू शकता.
लसूण : लसूण हे डासांना घालवण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. यासाठी 2 ते 4 कळ्यांना हलके चेचून 1 ग्लास पाण्यात उकळवून घ्या. या पाण्याला थंड करून स्प्रे बॉटलमध्ये भरून स्टोअर करा. संध्याकाळच्या वेळी लसणाचे हे पाणी पूर्ण घरात शिंपडा. लक्षात ठेवा की हे पाणी घराच्या कोपऱ्यांमध्ये चांगल्यारीतीने टाकले गेले पाहिजे. जेणेकरून घरातून डास पूर्णपणे दूर पळतील.
सोयाबिनचे तेल : डासांना घालवण्यासाठी सोयाबिन तेल हेही एक चांगला उपाय आहे. यासाठी 5 ते 7 कापसाचे बोळे घेऊन त्याला सोयाबीन तेल लावा. यानंतर कापसाच्या बोळ्यांना घराच्या प्रत्येक कोन्यात ठेवून द्या. यामुळे तुमच्या घरात डास येणार नाहीत.
पुदिन्याचा रस : डासांना पुदिन्याच्या सुवास आवडत नाही. त्यामुळे डासांना घालवण्यासाठी पुदिन्याचा रस संपूर्ण घरात शिंपडा. तुम्ही पुदिन्याची पाने जिथे डास जास्त आहेत अशा कोपऱ्यांमध्ये ठेवू शकता. यानेदेखील घरातून डास निघून जातील.
कडुनिंबाचे तेल : घरातून डास घालवण्यासाठी तुम्ही कडुनिंबाच्या तेलाचा शिडकावा घरात करू शकता. याशिवाय तुम्ही कडुनिंबाचे तेल शरीराच्या वेगवेगळ्या भागांना लावू शकता. यामुळे डासांपासून तुमचे संरक्षण होऊ शकते.
Comments are closed.