'फायनलमध्ये पाहूया…’ दोन वेळा हरल्यानंतरही शाहीन आफ्रिदीने टीम इंडियाला दिले 'हे' आव्हान

आशिया कप 2025 मध्ये दोनदा टीम इंडियाकडून पराभव पत्करूनही त्याच्या अहंकारात किंचितही फरक पडलेला नाही. बांगलादेशविरुद्धच्या अखेरच्या लीग सामन्याआधी जेव्हा त्याला टीम इंडिया संदर्भात विचारणा झाली, तेव्हा त्याने सूर्या आणि संघाला पुन्हा आव्हान दिले आहे.

सुपर-4 फेरीत झालेल्या सामन्यात अभिषेक आणि तिलक वर्मा यांनी अफरीदीची जोरदार धुलाई केली होती. अफरीदीने आपल्या केवळ 3.5 षटकांत तब्बल 40 धावा दिल्या होत्या. भारतीय संघाने हसत-खेळत पाकिस्तानला तब्बल 6 गडी राखून पराभूत केले होते.

जेव्हा पत्रकार परिषदेत शाहीन शाह अफरीदीला सूर्यकुमार यादवने दिलेल्या ‘रायव्हलरी’वरील वक्तव्याबद्दल विचारले, तेव्हा तो वेगळ्याच थाटात दिसला. तो म्हणाला, “फायनलपर्यंत ना ते पोहोचलेत, ना आपण. जेव्हा पोहोचू, तेव्हा बघू. आमचे काम आशिया कप जिंकणं आहे.” सांगायचे म्हणजे, पाकिस्तानविरुद्ध सुपर-4 फेरीत झालेल्या पराभवानंतर रायव्हलरीबाबत विचारलेल्या प्रश्नावर अफरीदीने पाकिस्तानचीच खिल्ली उडवली होती.

सूर्याचे म्हणणे असे होते की ‘रायव्हलरी’ ही दोन समान ताकदीच्या संघांमध्ये असते. जर एखाद्या संघाने 15-20 सामने एकमेकांविरुद्ध खेळले आणि स्कोअरलाइन 10-1 किंवा 13-0 अशी असेल, तर त्याला रायव्हलरी म्हणता येत नाही. सूर्यानं मजेशीर अंदाजात पत्रकारांना भारत-पाकिस्तान रायव्हलरीबद्दल प्रश्नच विचारू नये अशी सूचनाच केली होती.

आशिया कप 2025 मध्ये पाकिस्तानला टीम इंडियाकडून दोनदा पराभवाचा सामना करावा लागला आहे. गट फेरीत भारतीय संघाने शेजारील देशाला तब्बल 7 गडी राखून धूळ चारली होती. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ 20 षटकांत फक्त 127 धावांपर्यंतच मजल मारू शकला, ज्याचा पाठलाग टीम इंडियाने हसत-खेळत पूर्ण केला होता.

Comments are closed.