महाराष्ट्रातही ‘वनतारा’ उभारण्यासाठी अनंत अंबानींना पत्र; राज्य सरकारचे अंबानींना साकडे

महाराष्ट्रात पत्र-टू-अ‍ॅन्ट-अंबानी-ते-स्थापना-वंतारा

महाराष्ट्रात वाघांची संख्या वाढत आहे. वन्यप्राण्यांच्या संवर्धनासाठी अनंत अंबानी यांनी गुजरातमध्ये जसे ‘वनतारा’ प्राणिसंग्रहालय उभारले आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही वन्यप्राण्यांसाठी वनतारासारखा प्रकल्प उभारण्यासाठी उद्योगपती अनंत अंबानी यांना राज्य सरकारने पत्र पाठवले आहे. अशा प्राणिसंग्रहालयासाठी उद्योगपतींनी पुढाकार घेण्यासाठी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी आज विधानसभेत सांगितले.

भंडारालगतच्या कोका वन्यजीव अभयारण्याच्या बफर झोनलगत सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या एका महिलेला वाघाने हल्ला करून ठार मारल्याचा मुद्दा विजय वडेट्टीवार यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून उपस्थित केला होता.

महाराष्ट्रात 444 वाघ

महाराष्ट्रातील वाघांची संख्या 101 होती. ती संख्या वाढून आता 444 इतकी झाल्याची माहिती गणेश नाईक यांनी यावेळी दिली.

तज्ञांची समिती स्थापन करा आदित्य ठाकरे यांची सूचना

दहा-पंधरा वर्षांपूर्वी अकराशे वाघ होते; पण आता तीन हजारांच्या आसपास वाघांची संख्या झाली आहे हे आपल्या देशाचे काwतुक आहे. पण यामध्ये मानव व वन्यप्राण्यांमधील संघर्ष महत्त्वाचा आहे. हा संघर्ष संपवण्यासाठी समिती स्थापन करावी. अशा समितीमध्ये केवळ राजकारणी, तर तज्ञांचा समावेश करावा. या तज्ञांच्या माध्यमातून चांगले काही राज्यासाठी करू शकतो. राजस्थान, मध्य प्रदेशने पर्यटनाच्या माध्यमातून महसूल मिळवला आहे. आपणही राज्यासाठी आपण हे करू शकतो. त्यामुळे मानव- वन्यप्राण्यातला संघर्ष संपवण्यासाठी समिती स्थापन करावी, अशी सूचना शिवसेना नेते आणि शिवसेना विधिमंडळ पक्षनेते आदित्य ठाकरे यांनी केली.

शुक्रवारी बैठक

राज्यात वाघ आणि बिबटय़ांमुळे मानव-प्राणी संघर्ष निर्माण होत असल्याची तक्रार सर्वच पक्षांच्या सदस्यांनी केली. त्यामुळे या मुद्दय़ावर तोडगा काढण्यासाठी येत्या शुक्रवारी विधानसभाध्यक्षांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले.

Comments are closed.