लेफ्टनंट कर्नल पुरोहिटने 'कर्नल' च्या पदावर पदोन्नती दिली
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींना काही महिन्यांपूर्वी निर्दोष मुक्त करण्यात आले होते. आता त्यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांना कर्नल पदावर बढती देण्यात आली. पत्नी अपर्णा यांनी गुरुवारी यासंबंधीची अधिकृत माहिती दिली. 31 जुलै 2025 रोजी 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींना विशेष एनआयए न्यायालयाने निर्दोष मुक्त केले होते. या आरोपींमध्ये लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यांचाही समावेश होता. मात्र, तपासामध्ये लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यांच्या निवासस्थान ‘ए-9’ येथे कोणतेही आरडीएक्स, स्फोटक पदार्थ किंवा बॉम्ब बनवण्याचे संशयास्पद साहित्य आढळल्याचे ठोस पुरावे न सापडल्याने ते दोषमुक्त ठरले होते. 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगाव येथील एका मशिदीत झालेल्या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता. तसेच 100 हून अधिक जण जखमी झाले होते.
Comments are closed.